Headlines

मोठी बातमी : माणिकराव कोकाटेंचा मंगळवारपर्यंत राजीनामा होण्याची शक्यता, मात्र राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह!

मोठी बातमी : माणिकराव कोकाटेंचा मंगळवारपर्यंत राजीनामा होण्याची शक्यता, मात्र राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह!
मोठी बातमी : माणिकराव कोकाटेंचा मंगळवारपर्यंत राजीनामा होण्याची शक्यता, मात्र राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह!


Manikrao Kokate : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकांटेंसदर्भात (Manikrao Kokate) मंगळवारपर्यंत अजितदादा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवारांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगेंना असं आश्वासन दिल्याची माहिती घाडगेंनी दिली आहे. तर थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची पुण्यात भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं थोड्याच वेळात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार की नाही याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता.. सूत्रांची माहिती

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षात दोन मतप्रवाह

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एका गटाच म्हणणं आहे की कोकाटे यांचा राजीनामा घेतला नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. गावा गावात मतदारांपर्यंत जाताना शेतकरी रोषाला सामोरे जावे लागेल, सध्या राज्यात कृषिमंत्र्यांच्या कृतीवरून आणि वक्तव्यावरून प्रचंड जनक्षोभ होण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या गटाच म्हणणं आहे की, माणिकराव कोकाटे 4 वेळा आमदार राहिले आहेत. पक्षातील अनुभवी आणि वरिष्ठ नेते आहेत त्यामुळे राजीनामा नको, असे दोन मतप्रवाह असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची का होतेय मागणी? 

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokateविधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर केला होता. यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यावर माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले होते की, वरच्या सभागृहात कामकाज तहुकुब झाल्याने मी तिथे बसलो होतो. खालच्या सभागृहात काय सुरू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला. मोबाईल ओपन करून युट्युबवर जात असताना अनेक प्रकारच्या जाहिराती समोर येतात. त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात. त्या जाहिराती स्किप करताना दोन-तीन सेकंद लागले. त्यांनी 18 सेकंदाचाच व्हिडिओ दाखवला आहे. त्यांनी पुढचा व्हिडिओ दाखवलाच नाही. ते कधी माझ्या कपड्यावर बोलत आहे. कधी माझ्या मोबाईलवर बोलत आहे. कधी माझ्या गाडीवर बोलताय पण माझ्या धोरणावर, माझ्या कामावर आणि मी शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांवर कुठलाही विरोधी पक्ष नेता बोलत नाही. माझं काम पारदर्शी आहे. माझा स्वभाव स्पष्ट आहे. तेथे कॅमेरे चालू असतात. मी कशाला गेम खेळत बसू? गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाहीअसे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले होते. दरम्यान, विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळण्याच्या या प्रकारावर विरोधकांनी कोकाटेंवर जोरदार टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या:

Manikrao Kokate and Sunil Tatkare: माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रिपद धोक्यात, तटकरे म्हणाले, ‘त्यांच्याकडून अयोग्य घडलं, पक्ष योग्य निर्णय घेईल!’

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *