Headlines

Ujjwal Nikam : दळभद्री विरोधकांनी कसाबची बाजू घेतली, भाजपचे खासदार होताच उज्ज्वल निकम यांचा हल्लाबोल

Ujjwal Nikam : दळभद्री विरोधकांनी कसाबची बाजू घेतली, भाजपचे खासदार होताच उज्ज्वल निकम यांचा हल्लाबोल
Ujjwal Nikam : दळभद्री विरोधकांनी कसाबची बाजू घेतली, भाजपचे खासदार होताच उज्ज्वल निकम यांचा हल्लाबोल


मुंबई : लोकसभा निवडणुकीत दळभद्री विरोधकांनी कसाबची बाजू घेतली, असा आरोप करत खासदार उज्ज्वल निकम यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मुंबईतील सत्कार समारंभात बोलताना निकम यांनी हे वक्तव्य केलं. कसाबच्या गोळीने कामटे, करकरेंचा मृत्यू झाला नाही असं विरोधक सांगत असल्याचा दावाही निकम यांनी केला. पाकिस्तानने यावर कधी शब्द काढले नाहीत, पण विरोधक कसाबची बाजू घेत होते, असं निकम म्हणाले.

ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नुकतीच राज्यसभा सदस्य पदी वर्णी लागली. या नियुक्तीबद्दल शनिवारी दादर येथील वसंत स्मृती सभागृहात निकम यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उज्ज्वल निकम यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केलं.

काँग्रेस नेत्यांवर टीका

त्या कसाबला फाशी दिली त्याच्याबद्दल पाकिस्तानने कधीही शब्द काढला नाही. पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी माझ्या विरोधकांनी सांगितलं की, कसाबच्या गोळीने कामठे, करकरेंचा मृत्यू झाला नाही. त्यांना आरएसएसच्या एका इन्स्पेक्टरने मारलं. उज्ज्वल निकमांना ही गोष्ट माहिती होती. उज्ज्वल निकम हे देशद्रोही आहेत असं काँग्रेसचा एक मोठा नेता म्हणाला.

उज्ज्वल निकम म्हणाले की, राजकारण करण्यासाठी, काही लोक बेगडी प्रेम दाखवतात मला राजकारणात यायचे नव्हते. पण देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांचा आग्रह होता. याआधीही मी काही राजकीय पक्षांना नम्रपणे नकार दिले होते. भाजपने तिकिट दिले तेव्हा मला प्रश्न विचारले, भाजप का निवडला? या पक्षात राष्ट्राबद्दल जे प्रेम आहे, ते कुठल्याही पक्षात दिसले नाही असे उत्तर मी दिले. तरीही मी काही मतांनी निवडणूक हरलो.

मोदीजीनी मराठीतून संवाद साधला

उज्ज्वल निकम म्हणाले की, “माझ्या नियुक्तीची घोषणा झाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः हून फोन केला. त्यावेळी माझ्यासमोर प्रश्न होता, काय करायचे? मोदीजींनी म्हटले मराठीत बोलू की हिंदी मध्ये. मी हसलो, ते खदखदून हसले. मी कधीही त्यांना एवढे खदखदून हसताना बघितले नव्हते. त्यांच्या हसण्याचा कुणीही वेगळा अर्थ काढू शकतात, म्हणून त्यांना स्थितप्रज्ञ राहावे लागते.”

कुठल्याही गुन्हेगाराला मी न्यायालयाच्या माध्यमातून शिक्षा देण्याचा प्रयत्न करतोच. मात्र त्या गुन्हेगाराला समजून घेण्याचा पण प्रयत्न करतो. त्यातील विक पॉईंट जाणून घेतो, जेणेकरून त्याला अंतरिम दुख देण्याचा माझा प्रयत्न असतो असं उज्ज्वल निकम म्हणाले. तुरुंग हा जर मला मतदारसंघ दिला, तर मला कुणीही हरवू शकणार नाही. सर्व कैदी मला निवडून देतील, याची मला खात्री आहे असं उज्ज्वल निकम म्हणाले.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *