
Sanjay Shirsat Majha Katta : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, हे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उद्धव ठाकरेंना जाऊन सांगावे असे वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले. माझा कट्ट्यावर बोलताना दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजेत असं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांनी आज एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का? यावर आज भाष्य करणं योग्य होणार नाही. दरी खूप वाढली असल्याचे शिरसाट म्हणाले. संधी पाहून राजकारण हे आत्ताच होत नाही, महाराष्ट्राची ही परंपरा आहे. प्रत्येक पक्षातील लोक इकडे तिकडे आले आहेत. उद्या आमचं काय होईल हे शिंदे साहेब ज्यावेळी निर्णय घेतील त्यावर अवलंबून असल्याचे शिरसाट म्हणाले.
ठाकरेंच्या जवळ मिसगाईड करणारे लोक, त्यामुळेच ही अवस्था झाली
आम्ही कधी फुटायच्या मनस्थितीत नव्हतो. पण आम्हाला अनुभव आला आहे की, ते ऐकणार नाहीत. आम्ही शेवटच्या वेळेपर्यंत प्रयत्न केल्याचे शिरसाट म्हणाले. ठाकरेंच्या जवळ मिसगाईड करणारे लोक असल्यामुळं आज ही अवस्था झाल्याचे शिरसाट म्हणाले. उद्धव ठाकरे राजे आहेत. त्यांच्यातला एखादा सैनिक गेला तर त्यांना काही फरक पडतो, ते तसं बोलतात. ज्यांना राहायचं त्यांना राहा ज्यांना जायचं त्यांनी जा असे संजय शिरसाट म्हणाले. आम्ही सैन्याच्या भूमिकेत होते. राजकाराण मेहनत करावी लागते. चुकीच्या मार्गाने काही करात तर ते टिकत नाही असे शिरसाट म्हणाले. अनेक दिग्गज लाईनमध्ये असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला तिकीट दिलं होतं असे संजय शिरसाट म्हणाले. अनेकजण असताना बाळासाहेब म्हणाले संजयच उमेदवार राहिल असे शिरसाट म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत याचा आनंद आहे. दोन्ही भाऊ मराठी मुद्यावर एकत्र आल्याचे शिरसाट म्हणाले.
बेडरुममध्ये एवढे पैसे कसे आले? शिरसाट यांनी केला मोठा खुलासा
तो व्हिडीओ चुकीचा आहे. यामुळं आता आम्हाला अलर्ट राहावं लागेल. आता कोणताही माणूस घरात येऊ द्यायचा नाही असे शिरसाट म्हणाले. हा व्हिडीओ कोणी काढला हे मला माहित आहे. मला मंत्रीपद मिळण्याच्या चर्चेपासून हे सुरु झालं आहे. एकनाथ शिंदे यांना देखील काही माहिती पाठवण्यात आले होते. संजय शिरसाट यांना जर मंत्रीपद दिले तर ती माहिती व्हायरल करु असे सांगितले होते. कोणताही राजकीय नेता आपल्या पक्षाची बदनामी सहन करणार नाही. यानंतर मला शिंदे साहेबांनी बोलावून घेतलं होतं. 20 ते 22 पानांचे चॅट शिंदे साहेबांना पाठवले होते. पण त्याच्याशी माझा काहीही संबध नसल्याचे शिरसाट म्हणाले. मी शिंदे साहेबांना म्हणालो हे कन्फर्म करा. हे जर सत्य असेल तर मंत्रीपदाचा नाहीतर आमदारकीचा राजीनामा देऊन घरी जाईल असे शिरसाट म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Ambadas Danve : शिवसेना कुणीतरी फोडली याची खंत, दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात ही आशा; अंबादास दानवे यांचे मोठं वक्तव्य
आणखी वाचा