
Chitra Wagh on Pune Rave Party: पुण्यातील खराडी येथील उच्चभ्रू परिसरातील एका सोसायटीत शनिवारी रात्री सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Police) छापा टाकला. यावेळी पोलिसांनी या फ्लॅटवरुन दारु, हुक्का आणि गांजा-कोकेन यासारखे अंमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी पाच पुरुष आणि दोन महिलांना अटक केली आहे. यामध्ये एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचाही समावेश होता. त्यांच्या अटकेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे हे सातत्याने महायुतीच्या नेत्यांवर तुटून पडत होते. एकनाथ खडसे यांनी भाजपचे सामर्थ्यशाली नेते गिरीश महाजन यांना लक्ष्य केले होते. तर रोहिणी खडसे या विविध मुद्द्यांवरुन महायुतीवर जोरदार टीका करताना दिसत होत्या. मात्र, आता रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक होताच खडसे यांची कोंडी झाली आहे. मुक्ताईनगरमधील खडसेंचे विरोधक चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर भाजपच्या प्रमुख महिला नेत्यांपैकी एक असणाऱ्या चित्रा वाघ यांनीही रोहिणी खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ यांनी एक ट्विट करत रोहिणी खडसे आणि सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले आहे.
BJP leader Chitra Wagh: चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं?
ओऽऽऽऽऽ१२मतीच्या मोठ्ठया ताई…
@supriya_sule
तुमच्या तर दिव्याखालीचं अंधार होऽऽऽ
तुमच्या वाजंत्रीताई
महाराष्ट्रात ड्रग्स येतात कुठून हा प्रश्न सरकारला विचारतात
त्याआधी त्यांनी स्वत:च्या नवऱ्याला प्रांजल खेवलकरना हा प्रश्न विचारायला हवा…
महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटनेत सरकारला जबाबदार धरणाऱ्या आमच्या नावाने कायम तुतारी वाजवणाऱ्या वाजंत्री ताईंनी आधी स्वत:च्या घराकडे लक्ष द्यावे…
आणि हो…..तुमचा नवरा लहान नाही की त्याला कोणी उचलून आणून रेव्हपार्टीत बसवेल नाही तर यात ही पुन्हा सरकारलाच जबाबदार धराल…
राज्यात जेव्हापासून देवाभाऊंचे भाजपा-महायुतीचे सरकार आलयं तेव्हापासून ड्रग्सची प्रकरणे बाहेर येत आहेत. आधी ती बेमालूमपणे का लपवली जायची कोण लपवायचे याचे गूढ इथेच कुठेतरी दडलं आहे असं की काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडतोय आणि गुन्हे उघड झाल्यावर वाजंत्रीताई चोराच्या उलट्या बोंबा मारायला पुढे येतात हेही गुपित उघड झालं….
आणखी वाचा
आणखी वाचा