Headlines

Manikrao Kokate and Ajit Pawar: माणिकराव कोकाटेंनी चेंबरमधून बाहेर पडताना सर्व आशा सोडल्या, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजितदादांच्या 'त्या' अटीने गेमच पालटला

Manikrao Kokate and Ajit Pawar: माणिकराव कोकाटेंनी चेंबरमधून बाहेर पडताना सर्व आशा सोडल्या, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजितदादांच्या 'त्या' अटीने गेमच पालटला
Manikrao Kokate and Ajit Pawar: माणिकराव कोकाटेंनी चेंबरमधून बाहेर पडताना सर्व आशा सोडल्या, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजितदादांच्या 'त्या' अटीने गेमच पालटला


Manikrao Kokate and Ajit Pawar: अधिवेशनकाळात विधानपरिषदेचे कामकाज सुरु असताना ऑनलाईन रमी खेळत असल्याचा ठपका असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना पुन्हा एकदा अभय मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी होणार, या चर्चेने जोर धरला होता.

माणिकराव कोकाटे हे मंगळवारी सकाळी मंत्रालयात अजित पवार यांना भेटण्यासाठी आले होते. अजितदादांच्या अँटी चेंबरमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 25 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेचे फलित माणिकराव कोकाटे यांच्यासाठी फारसे चांगले नव्हते. त्यामुळे माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्य दालनातून एकही शब्द न बोलता मंत्रिमंडळाच्या बैठकीला निघून गेले होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणारच, अशी वदंता पसरली होती. परंतु, मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका खेळीने सर्व चित्र पालटल्याचे दिसून आले. 

अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा विषय येताच सगळ्यांनाच बुचकाळ्यात टाकणारी भूमिका घेतली.  शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाई झाली तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) मंत्र्यांवर कारवाई होणार, असे अजितदादांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कोकाटेंच्या राजीनाम्याविषयी काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  माणिकराव कोकाटेंना संधी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. कोकाटे यांच्यावर कारवाई नको तर त्यांना समज देऊयात. कोकाटे यांचे काम चांगले आहे, त्यांना संधी देऊयात, असे मत सर्व मंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे मांडल्याची माहिती समोर येत आहे. 

Ajit Pawar: अजितदादा माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय म्हणाले?

आज माणिकराव कोकाटे आपल्या मुलीसह मंत्रालयात आले होते. त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अँटी चेंबरमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. अँटी चेंबरमध्ये झालेल्या चर्चेवेळी अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवं’, असे अजित पवार यांनी कोकाटे यांना म्हटल्याचे समजते. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी झाल्या प्रकाराबद्दल अजित पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. पुढील काळात अशा बाबी घडणार, असे आश्वासनही कोकाटे यांनी अजितदादांना दिले. 

आणखी वाचा

राजीनाम्याचा निर्णय झाला? अजितदादांच्या चेंबरमधून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची देहबोली सगळं सांगून गेली, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *