
Rupali Chakankar: जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने “संवेदनशीलता ते संकल्प: शोषणाविरोधात लढा” या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले आहे. एक दिवसीय परिसंवादाचे उद्घाटन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर देखील उपस्थित आहेत. दरम्यान, या परिसंवादाला सुरुवात झाली असून आम्हाला मानसिकता बदलायची आहे. समाजातील समस्या मोठ्या प्रमाणात असल्याचं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
महिला कार्यक्रमाला पुरुष मंडळी देखील उपस्थित आहेत त्याचा आनंद आहे. आम्हाला मानसिकता बदलायची आहे. आमची 150 वर्षांआधी बदललेली आहे. आता समाजाची मानसिकता बदलायची आहे.आम्ही तुमच्याबरोबर आहोत ते सांगण्यासाठी मंत्री पंकज भोयर आणि हारुन खान आलेत त्याचा आनंद असल्याचं रुपाली चाकणकरांनी स्पष्ट केलं. समाजातील समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. अनिष्ठ रुढी परंपरा मोडीत काढण्यासाठी चळवळ उभी करावी लागणार आहे. आजही हुंडाबळीसाठी बळी घेतले जातात ही शोकांतिका आहे. प्रगतीकडे वाटचाल करत असलो तरी आपली दरी मोठी असल्याचं रुपाली चाकणकरांनी सांगितलं.
गाड्यांचे शोरूम असतात तसे परदेशात महिलांचे शोरुम – रुपाली चाकणकर
मानवी तस्करीच्या माध्यमातून मिसिंग केसेसची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवणं, नोकरीच्या जाळ्यात अडकवणं, बाल कामगार, पुरुष देखील मानवी तस्करीत असू शकतो.यासंदर्भात आम्ही मोहिम हाती घेतली आहे. गेल्या दोन वर्षांत मस्कत, दुबईतून महिलांना परत आणण्यात यशस्वी झालो. 24 महिलांना आपण परदेशातून परत आणलं. गाड्यांचे शोरूम असतात तसे परदेशात महिलांचे शोरुम असतात, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
तस्करीच्या यंत्रणेवर घाव घातला पाहिजे- रुपाली चाकणकर
हे अतिशय दुर्दैवी आहे. मानवी तस्करी टाळण्यासाठी आपण मोहिम हाती घेतली आहे.जनजागृती मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. तस्करीच्या यंत्रणेवर घाव घातला पाहिजे. दिवसभराच्या चर्चासत्रेत ही यंत्रणा कशी काम करतात ही माहिती आपण देणार आहोत. मानवी तस्करीसंदर्भातला कृती आराखडा विचारात घेतला जाईल. राज्य महिला आयोगाने ई सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न आम्ही केलेत. कौटुंबिक हिंसाचाराच्या मोठ्या घटना कोरोना काळात घडल्या, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा