Headlines

Malad Crime : हस्ताक्षर चांगलं नाही, 8 वर्षाच्या विद्यार्थ्याच्या हातावर मेणबत्तीने चटके दिले; ट्युशन शिक्षिकेविरोधात गुन्हा

Malad Crime : हस्ताक्षर चांगलं नाही, 8 वर्षाच्या विद्यार्थ्याच्या हातावर मेणबत्तीने चटके दिले; ट्युशन शिक्षिकेविरोधात गुन्हा
Malad Crime : हस्ताक्षर चांगलं नाही, 8 वर्षाच्या विद्यार्थ्याच्या हातावर मेणबत्तीने चटके दिले; ट्युशन शिक्षिकेविरोधात गुन्हा


मुंबई : मुलाला हस्ताक्षर चांगले येत नसल्यामुळे ट्युशन शिक्षिकेकडून तळहातावर मेणबत्तीचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मालाड पूर्वेत गोकुळधाम फिल्म सिटी रोडवर एका खाजगी ट्युशनमध्ये ही धक्कादायक घटना घडली. मारहाण करून लहान मुलाच्या हातावर मेणबत्तीने चटका देणारी आरोपी शिक्षिका राजश्री राठोड विरोधात कुरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इयत्ता चौथीत शिकणाऱ्या आठ वर्षाच्या मुलासोबत ही घटना घडली असून त्याच्या वडिलांनी याची तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी या खासगी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला.

शिक्षिकेने खोटं सांगितलं

मालाड पूर्व पिंपरी पाडा येथे राहणाऱ्या 50 वर्षीय तक्रारदाराच्या आठ वर्षाच मुलगा मंगळवारी संध्याकाळी ट्युशनसाठी गेला होता. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ट्युशन शिक्षिकेने तक्रारदाराला मुलाचे ट्युशन संपल आहे त्याला घेऊन जा असा फोन केला.

तक्रारदाराने मोठ्या मुलीला त्या मुलाला घरी आणण्यासाठी पाठवलं. पण तो मुलगा ट्युशनमध्ये रडताना दिसला. मुलीने शिक्षिकेला रडण्याचे कारण विचारले असता त्याला अभ्यासाचा कंटाळा आहे म्हणून तो रडत आहे असं तिने सांगितलं

हातावर मेणबत्तीचे चटके

मुलाने घरी आल्यानंतर आईला हात दाखवला. त्यावेळी दोन्ही हातांवर भाजल्याच्या जखमा होत्या. त्यावर हस्ताक्षर चांगलं नसल्याने शिक्षिकेने आपल्याला मारल्याचं मुलाने पालकांना सांगितलं. तसेच हातावर मेणबत्तीचे चटके दिल्याचंही सांगितलं. त्यानंतर पालकांनी मुलाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालया दाखल केले.

मुलाच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून कुरार पोलीस स्टेशनमध्ये शिक्षिकेविरोधात मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *