Headlines

Mithi River Scam : मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी नवी अपडेट; मुंबई पोलिसांकडून 2 आरोपींविरोधात 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल, निविदांमध्ये फेरफार केल्याचा आरोप

Mithi River Scam : मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी नवी अपडेट; मुंबई पोलिसांकडून 2 आरोपींविरोधात 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल, निविदांमध्ये फेरफार केल्याचा आरोप
Mithi River Scam : मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी नवी अपडेट; मुंबई पोलिसांकडून 2 आरोपींविरोधात 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल, निविदांमध्ये फेरफार केल्याचा आरोप


Mithi River Scam: मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. या आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2 आरोपींविरोधात 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने केतन कदम आणि जय जोशी यांच्याविरुद्ध 7, 000 पानांचे एक मोठे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने 16 ते 17 जणांचे जबाब नोंदवलेले आहेत. यात निविदांमध्ये फेरफार करून आरोपींनी 9 कोटी रुपयांपैकी 4.5 कोटी स्वत:कडे ठेवल्याचा आरोप आहे.

तसेच केतन कदम आणि जय जोशी यांनी मध्यस्थ म्हणून काम केले असून पूर्व-निवडलेल्या कंपन्यांनाच गाळ काढण्याचे कंत्राट मिळावे, यासाठी खासगी कंपन्यांचे संचालक आणि पालिकेतील वरिष्ठ अधिकारी यांनी प्रयत्न केल्याचा आरोप आरोपपत्रातून करण्यात आला आहे. यात संबधित कंपनीलाच गाळ काढण्याचे कंत्राट मिळावे या अनुंशंगाने तशा नियम, अटी आणि शर्ती घालण्यात आल्या. अशी सुद्धा माहिती समोर आली आहे.

2022 आणि 2023 मध्येही असाच प्रकार घडल्याचे तपास यंत्रणेच्या निदर्शनास

दरम्यान, प्रत्यक्ष यंत्रसामग्री तैनात नसतानाही 2021पासून पैसे वितरित करण्यात आल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. महत्वाचं म्हणजे 2021मध्ये, गाळ काढण्यासाठी आठ मशीनची आवश्यकता होती, तरीही जूनपर्यंत एकही तैनात करण्यात आली नाही. 2022 आणि 2023 मध्येही असाच प्रकार घडल्याचे तपास यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. त्यावेळीही गाळ काढण्यासाठी मशीन वापरण्यात आली नसताना पैसे दिल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तर 6 मे रोजी आझाद मैदान पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये 13 आरोपींची नावे आहेत. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांमध्ये सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे (मुख्य आरोपी म्हणून नियुक्त), निवृत्त मुख्य अभियंता गणेश बेंद्रे आणि उपमुख्य अभियंता (पूर्व उपनगरे) तैशेत्ये यांचा समावेश आहे. तर खाजगी क्षेत्रातील, प्रमुख आरोपींमध्ये दीपक मोहन आणि किशोर मेनन (मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक), भूपेंद्र पुरोहित (त्रिदेव कॉन्ट्रॅक्टर्सचे मालक) आणि अ‍ॅक्युट कन्स्ट्रक्शन, कैलास कन्स्ट्रक्शन, एन.ए. कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक यांचाही गुन्ह्यात समावेश आहे.

स्वतंत्र गुन्हा नोंदवून ईडीनेही केली तपासाला सुरूवात

पुढे आलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीनेही या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली आहे. या प्रकरणी ईडीने दोन दिवसापूर्वी मुंबई मिठीनदीचे गाळ काढण्यासंदर्भात कंत्राट दिलेल्या कंपन्यांच्या कार्यालयावर छापेमारी केली होती. तर काही दिवसांपूर्वी अभिनेता दिनो मोर्याच्या घरीही ईडीने या प्रकरणी सर्च आॅपरेशन केले होते.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *