Headlines

Mumbai Crime News: तीनदा लग्न अन् शेवटी प्रेमभंग; खचलेल्या आईनं पोटच्या लेकराला पाळण्यातच संपवलं; काळीज पिळवटून टाकणारी मुंबईतील घटना

Mumbai Crime News: तीनदा लग्न अन्  शेवटी प्रेमभंग; खचलेल्या आईनं पोटच्या लेकराला पाळण्यातच संपवलं; काळीज पिळवटून टाकणारी मुंबईतील घटना
Mumbai Crime News: तीनदा लग्न अन्  शेवटी प्रेमभंग; खचलेल्या आईनं पोटच्या लेकराला पाळण्यातच संपवलं; काळीज पिळवटून टाकणारी मुंबईतील घटना


मुंबई: मुंबईतील शिवाजीनगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका आईनेच आपल्या पोटच्या 6 महिन्याच्या चिमुरड्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. गोवंडीच्या बैंगणवाडीतील ही घटना घडली आहे. गोवंडीच्या बैंगणवाडी परिसरात आरोपी महिला राहत असून तिने मुल झोपलेले असताना उशीने मुलाचे तोंड दाबून हत्या केली. या हत्येनंतर महिला स्वत: पोलिस ठाण्यात गेली आणि तिने केलेल्या चिमुकल्या जिवाची हत्येची कबूली पोलिसांना दिली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी महिला सुलताना अब्दुल खान हिच्या विरोधात कलम 103 भा न्या सं अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

नेमकं कारण काय?

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, गरिबी आणि आजारपणाला कंटाळून जन्मदात्या आईनं आपल्या पोटच्या 6 महिन्यांच्या बाळाची झोपाळ्यात झोपलेलं असतानाच उशीने तोंड दाबून हत्या केली. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 42 वर्षीय आईला अटक केली. गुरुवारी दुपारीच तिने आपल्या सहा महिन्यांच्या मुलाची पाळण्यात झोपलेला असताना उशीने तोंड दाबून हत्या केल्याचे सांगितले. ही महिला बैंगनवाडीत आपल्या आई-वडिलांसोबत राहते. नंतर शिवाजीनगर पोलिसांनी महिलेचे घर गाठले. तेव्हा घरातील झोपाळ्यात बाळ निपचित पडून होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे त्या बाळाला मृत घोषित केलं.

तीनदा लग्न अन् प्रेमभंग…

आरोपी महिलेने एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल तीन वेळा संसार थाटला. मात्र, तिन्ही वेळा संसार टिकला नाही. त्यानंतर तिचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. त्या नात्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तो प्रियकर देखील पळून गेला. सहा महिन्यांपूर्वी या महिलेने बाळाला जन्म दिला. त्यानंतर आईला गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आणि वैद्यकीय खर्च वाढल्याने ती मानसिकदृष्ट्या खचल्याचे पोलिसांना सांगितले. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *