
मुंबई : गणेशोत्सव आणि मुंबईकरांचे व महाराष्ट्रातील गणेशभक्तांचे (Ganeshotsav) वेगळेच नाते आहे. त्यामुळे, दरवर्षी गणेशोत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी, उत्साह आणि झगमगाट मुंबईत पाहायला मिळते. मुंबईतील गणेशमूर्ती हे अवघ्या महाराष्ट्राचं, देशभरातली गणेशभक्तांचं आकर्षण असतं. कारण, उंचच उंच आणि भल्या मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती सर्वांचे लक्ष वेधतात. मुंबईत (Mumbai) लागबागचा राजा असेल किंवा अनेक गणेश मंडळं असतील येथील विसर्जन मिरवणुका म्हणजे पर्वणीच असते. मात्र, गेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनला बंदी असल्याने गेल्या 177 दिवसांपासून विसर्जनाच्या प्रतिक्षेत असलेल्या चारकोपच्या राजाचे आज विसर्जन होत आहे. अखेर, न्यायालयाकडून मंडळाला बाप्पांच्या समुद्रातील विसर्जनासाठी परवानगी मिळाल्याने भक्तांमध्ये उत्साह आहे. त्याच पार्श्वभूमीवर धानुकर वाडी येथील तलावात चारकोपच्या राजाचे विसर्जन होत आहे.
पोओपी म्हणजेच ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्तींच्या नैसर्गिक स्थळांवर विसर्जनास मज्जाव करण्यात आल्याने माघी गणेशोत्सवातील 10 दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनाचे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, ‘चारकोपचा राजा’ मंडळाचा अपवाद वगळता अन्य मंडळांनी मंगळवारी कृत्रिम तलावातच मूर्तींचे विसर्जन केले. चारकोपच्या राजाचे विसर्जन करण्यात न आल्याने तेव्हापासून येथील गणपती बाप्पा विसर्जनाच्या प्रतिक्षेत होते. ‘या वर्षीचे गणपती विसर्जन आम्ही तूर्त स्थगित केले असून, पुढील निर्णय होईपर्यंत आमच्या राजाचे व्यवस्थित जतन करू’, असे ‘चारकोपचा राजा’ मंडळाचे मानद अध्यक्ष निखिल गुढेकर यांनी सोशल मीडियावरुन जाहीर केले होते. तसेच, गणेशमूर्ती मंडपातच ठेवण्याचा निर्णय या मंडळाने घेतला होता. मात्र, गणेशोत्सवाच्या महिन्यातच मंडळाने विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्याने बाप्पा आजच विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत.
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गेल्या 177 दिवसांपासून मंडपातच विराजमान राहिलेल्या मुंबईच्या कांदिवलीतील चारकोपच्या राजाचे आज विसर्जन होत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताा चारकोपचा राजा आज 177 दिवसांनी विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. या विसर्जनामागे एक खूप मोठा संघर्ष आहे, कारण 6 महिन्यांपासून कोर्टात अडकलेला बाप्पा आता विसर्जनासाठी निघाला. त्यामुळे, विसर्जन मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. गुलाल उधळत, ढोल-ताशांच्या गजरात या बाप्पाचं विसर्जन करण्यात येत आहे.
नियोजित दौऱ्यामुळे राज ठाकरे येऊ शकले नाहीत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शुभदा गुडेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेत विसर्जनसाठी येण्याची विनंती केली होती. चारकोपचा राजा गणपतीचे विसर्जन करण्यात येत असल्याचे पार्श्वभूमीवर हे निमंत्रण देण्यात आले होते. विसर्जन आरतीनिमित्ताने गणप्पती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येण्याची विनंती शुभदा गुडेकर यांनी केली होती. मात्र, रायगड येथे नियोजित दौरा असल्यामुळे आपण येऊ शकत नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले होते.
हेही वाचा
… तर तुमची अटक होईल, राज ठाकरेंचं भाषणातून सरकारला चॅलेंज; गृहमंत्री फडणवीसाचं थेट प्रत्युत्तर
आणखी वाचा