मुंबईतील Tardeo येथील Wellington Heights या इमारतीचे 18 मजले अवैध असल्याचा Supreme Court चा निर्णय कायम राहिला आहे. या मजल्यांवरील घरं रिकामी करण्याचे आदेश Court ने कायम ठेवले आहेत. इमारतीच्या 17 ते 34 व्या मजल्यावरील रहिवाशांना दोन आठवड्यात घरं रिकामी करण्याचे Supreme Court ने आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाचा हा आदेश योग्य असून त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांना घरं रिकामी करण्यासाठी वेळ हवा असल्यास उच्च न्यायालयाकडे विनंती करू शकता, असे Supreme Court ने सुनावणीदरम्यान सांगितले. बेकायदेशीर कृत्यांना संरक्षण देण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर केल्याचा हा गंभीर प्रकार असल्याची टीका उच्च न्यायालयाने केली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती Girish Kulkarni आणि न्यायमूर्ती Arif Doctor यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सोसायटीचे 18 मजले रिकामे करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने ‘कायद्याचं राज्य राहिलं पाहिजे’ असे मत नोंदवले आहे.