Headlines

Dadar Kabutar Khana: दादरमधील कबुतरखान्यासाठी जैन समाज एकटावला, रॅलीही काढली; आता मनसेचं प्रत्युत्तर, सांस्कृतिक दहशतवाद…

Dadar Kabutar Khana: दादरमधील कबुतरखान्यासाठी जैन समाज एकटावला, रॅलीही काढली; आता मनसेचं प्रत्युत्तर, सांस्कृतिक दहशतवाद…
Dadar Kabutar Khana: दादरमधील कबुतरखान्यासाठी जैन समाज एकटावला, रॅलीही काढली; आता मनसेचं प्रत्युत्तर, सांस्कृतिक दहशतवाद…


Dadar Kabutar Khana: मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यावर (Kabutar Khana) कारवाई करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य धोक्याचा विचार करत ही कारवाई करण्यात येत असून, या आदेशाचं उल्लंघन केल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दादरमधील कबुतरखाना देखील बंद करण्यात आला आहे. या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली असून जो कोणी इथे कबुतरांना खाण्यास देईल. त्यावर 500 रुपये दंड आणि गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दरम्यान दादमधील कबुतरखाना बंद झाल्यानंतर याला काही लोकांकडून विरोध करण्यात येत आहे. 

न्यायालयाच्या निर्देशानुसार कबूतर खाणे मुंबई शहरात बंद करण्यात आलेले आहेत. मात्र याला  काही लोकांकडून विरोध केला जातोय. मुंबईत कबूतरखाने सुरू राहावेत यासाठी जैन समाजाने रॅली देखील काढली. तसेच मंत्री आणि भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा यांनी देखील नागरिकांच्या मागणीची दखल घेण्याची विनंती केली आहे. मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहत पक्षी प्रेमी, साधु व नागरिकांच्या मागणीची दखल घेण्याची विनंती केली आहे. यासह या पत्रातून खाद्याअभावी कबुतरांच्या होणाऱ्या मृत्यूंकडेही लक्ष वेधले आहे. सोबतच आरे कॉलनी, बीकेसी, रेस कोर्स अशा विविध मोकळ्या पर्यायी जागांचा पर्याय सुचवत आणि जनभावनेची दखल घेऊन सुवर्णमध्य काढण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना मंगलप्रभात लोढा यांनी आवाहन देखील केलं आहे. आता मनसेने देखील या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 

कबुतरखान्यावर संदीप देशपांडे काय म्हणाले?

न्यायालयाच्या निर्देशानुसार कबूतर खाणे मुंबई शहरात बंद करण्यात आलेले आहेत. मात्र याला  काही लोकांकडून विरोध केला जातोय मुंबईत कबूतर खाणे सुरू राहावेत यासाठी रॅली देखील काढली जातेय. कबूतरखाने कसे धोकादायक आहे हे आता मनसेच्यावतीने सांगण्यात आले आहे, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले. निसर्गाचे चक्र बिघडवण्याचा अधिकार कोणालाही नाही. सांस्कृतिक दहशतवाद करणे योग्य नाही, असा सल्ला मनसेच्यावतीने देण्यात आलेला आहे. न्यायालयाने विचारपूर्वक निर्णय दिलेला आहे. त्यामुळे त्याचं पालन सुज्ञ नागरिकांनी केलं पाहिजे, असंही मनसेच्यावतीने सांगण्यात आलं आहे.

कबूतरखान्यावर बंदीप्रकरणी मंगलप्रभात लोढा यांचे आयुक्तांना पत्र-

मुंबईत कबूतरांना आहार देण्यावर निर्बंध लावण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून पक्षीप्रेमी, साधू-संत व नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेण्याची विनंती केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्ण मध्य काढण्याचे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले. लोढा यांनी पत्रात नमूद केले आहे की, आहाराअभावी कबूतरांचा रस्त्यांवर मृत्यू होत असून त्यामुळे नवीन सार्वजनिक आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. याबाबत महापालिकेने व्यापक आणि संतुलित दृष्टिकोन ठेवावा, अशी अपेक्षा लोढांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा:

कबुतरखाना हटवण्यासाठी मध्यरात्री पालिकेचं पथक आलं, पण जमावाने रोखलं; मुंबईतील दादरमध्ये नेमकं काय घडलं?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *