
Mumbai : मुंबईच्या कांदिवली पश्चिमेत पालिकेच्या आर/दक्षिण विभाग कार्यालय बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सोनेच्या वतीनं आंदोलन सुरु आहे. ऐन पावसाळ्यात घरे खाली करण्याची नोटील मुंबई महापालिकेनं दिली होती. यामुळं पालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. धोकादायक चाळीच्या नोटीस विरोधात पालिकेच्या आर दक्षिण कार्यालयावर मनसेच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला.
चारकोप विधानसभेतील इराणी वाडी (हेंमू कलानी रोड नं. 3) येथील बैठक चाळीतील रहिवाशांना ऐन पावसाळ्यात घरे सात दिवसात खाली करण्याच्या महापालिकेच्या आर दक्षिण विभागाने नोटीस पाठवले आहेत. ऐन पावसाळ्यात पालिकेने बैठ्या चाळीतील घरांना धोकादायक असल्याचे सी वनची नोटीस पाठवल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. पालिकेच्या आर दक्षिण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मनसे चारकोप विधानसभा विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो चाळकरी आणि मनसे कार्यकर्ते सहभागी झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. ज्या पालिका अधिकाऱ्याने ही नोटीस काढली च्या अधिकाऱ्याचा यावेळी आंदोलकांकडून निषेध करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षण, नवीन प्रभागानुसारच, सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब
आणखी वाचा