
मुंबई: कबूतरखाने बंद करण्यावरून भाजपमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडली. कबूतरखाने बंद करण्याला धार्मिक संघटनांनी विरोध केला आहे. या संघटनांची आणि भाजप नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भूमिका मिळती जुळती आहे. मुख्यमंत्र्यांसोबतचा या बैठकीला मंगल प्रभात लोढा देखील उपस्थित होते, या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर माहिती देताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. हायकोर्टात महानगरपालिकेला जायला सांगितलं आहे. पालिका स्वत: रिस्ट्रिक्डेड फिडिंग करणार आहे. कबुतर मरु नये यासाठीचे प्रयत्न महानगरपालिका करणार आहे. यासंदर्भात कमिटी देखील बनवली जाईल,अशी माहिती देखील लोढा यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबूतरखान्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोकांच्या भावना आणि शंभर वर्षांची जुनी परंपरा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. यापुढे कबूतरखान्यांमध्ये रेस्ट्रिक्टेड फिडींग सुरू होणार आहे. साफसफाईसाठी टाटाने तयार केलेल्या मशीनचा वापर केला जाईल. एकही कबूतर मरू नये याची काळजी सरकार, समाज आणि प्रशासन मिळून घेणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. महानगरपालिका या सर्व नियमांची अंमलबजावणी करणार आहे. कबूतरखान्यांचे पाणी परत जोडले जाईल आणि बंद केलेले कबूतरखाने पुन्हा सुरू होतील. पर्यायी जागांचा विचारही केला जाईल. ‘लोकांच्या जीवनाचे महत्त्व सर्वात मोठे आहे, पण त्याचबरोबर कबूतरही मरू नये. याचा समतोल साधण्याचा आदेश त्यांनी महानगरपालिकेला दिला आहे, हा निर्णय अतिशय समाधानकारक असून इतिहासात कायम राहील’, असंही पुढे लोढा म्हणालेत.
साफसफाई कबुतरखान्यात केली जाईल
जे पाणी कट केले होते, ते पुन्हा जोडणार आहे. हिंदू समाज, जैन समाजातर्फे मी सर्वांचे आभार मानतो. लोकभावना समजत हा निर्णय दिला आहे. साफसफाई कबुतरखान्यात केली जाईल. पर्यायी जागा न होता, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हेच राहिल. साफसफाई ठेवली जाईल, टाटांच्या मशीनचा वापर होईल, अशाच, पर्यायी जागेची व्यवस्था करण्याची गरजच नसेल. कमिटी देखील बनवली जाईल, ती जी सूचना देईल त्याचे पालन पालिकेला करावे लागेल, अशी माहिती देखील मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.
विष्ठा साफ करण्यासाठी देखील मशीनरीचा वापर
पुढे बोलताना लोढा म्हणाले, महानगरपालिकेच्या एफिडेविटमध्ये लिहिलं होतं, समिती गठीत होणार आहे. जे पाण्याची लाईन कट केली होती ती परत जोडली जाणार आहे. जे कबूतर खाणे बंद केले होते त्या ठिकाणी मशीनद्वारे कोणाला काही त्रास न होता काम आजपासून सुरू केले जाणार आहे. त्याचबरोबर पर्यायी जागा न देता जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत एकही कबूतर मरू नये असे सांगितलं होतं. त्याचबरोबर कबुतरांना खाद्य टाकण्याच्या वेळाही ठरवल्या जाणार आहे. जी कमिटी गठीत केली जाणार आहे ती सांगेल ते सर्व गोष्टींचे पालन केले जाणार आहे. याची जबाबदारी महानगरपालिकेची असणार आहे. अतिशय समाधानकारक असा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. सर्वांच्या भावना लक्षात घेत त्यांनी निर्णय दिला आहे. कबुतरांना खाद्य टाकल्याने कोणती आरोग्याची समस्या निर्माण होत असेल तर त्यासाठी मशीनरीनचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर त्यांची विष्ठा साफ करण्यासाठी देखील मशीनरीचा वापर करण्याचा विचार आहे. एकही कबूतर मरू देणार नाही. सर्व कबूतरखाने चालू करून त्या ठिकाणी महानगरपालिकेकडून काम सुरू केलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. सर्व गोष्टी लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
आणखी वाचा