Headlines

Mumbai Accident: रस्ता क्रॉस करताना भरधाव बाईकनं उडवलं, तरुणानं जागेवर जीव सोडला, मुंबईत अपघाताचा थरार

Mumbai Accident: रस्ता क्रॉस  करताना भरधाव बाईकनं उडवलं, तरुणानं जागेवर जीव सोडला, मुंबईत अपघाताचा थरार
Mumbai Accident: रस्ता क्रॉस  करताना भरधाव बाईकनं उडवलं, तरुणानं जागेवर जीव सोडला, मुंबईत अपघाताचा थरार


Mumbai Accident: सांताक्रुझ पश्चिम परिसरात एसएनडीटी कॉलेजसमोर भरधाव बाईकने रस्ता क्रॉस करत असलेल्या व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव गणेश लखन शाह (वय 39) असून, ते पायी रस्ता क्रॉस करत होते.

नेमकं घडलं काय?

ही घटना शनिवारी घडली. प्राथमिक माहितीनुसार, गणेश शाह हे रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे चालत जात होते. त्याचवेळी भरधाव वेगात येणाऱ्या बाईकने त्यांना समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की शाह काही फूट दूर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.अटक करण्यात आलेल्या बाईक चालकाचे नाव किनन मिसकिटा असून, तो 21 वर्षांचा आहे आणि जुहू कोळीवाडा परिसरात राहणारा आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

CCTV व्हायरल, बाइकचालकाला अटक

या घटनेनंतर सांताक्रुझ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी बाईक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आणि जुहू कोळीवाडा परिसरातून त्याला अटक केली.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव किनन मिसकिटा असून, तो 21 वर्षांचा आहे आणि जुहू कोळीवाडा परिसरात राहणारा आहे. अपघात कशामुळे घडला, याबाबत सांताक्रुझ पोलीस अटक आरोपीकडून अधिक तपास करत आहेत.

तोंडाला रुमाल लावून चड्डीवर एन्ट्री

जळगावमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव शहरात चड्डी गँगने धुमाकूळ (Jalgaon Robbery In Temple) घातला आहे. चड्डी गँगने जळगाव शहरातील दोन मंदिरांमधून चांदीच्या पादुका, गणपतीमूर्ती, दान रक्कम लांबवल्याचेही समोर आले आहे. तसेच चोरट्यांच्या हातात चॉपर, चाकू, तलवारी यासारखे शस्त्रदेखील असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. एकाच रात्री चार ठिकाणी चोरी झाल्याने परिसरातील नागरिक देखील आता भयभीत झाले आहेत. 

जळगाव शहरात मध्यरात्रीच्या वेळी मंदिरांचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दोन मंदिरांमधून चांदीच्या पादुका, मूर्ती, दानपेटीतील रक्कम व इतर साहित्य चोरून नेले. तर तिसऱ्या मंदिरात त्यांच्या हाती काहीच न लागल्याने तेथून पेन ड्राईव्ह चोरून नेला. याशिवाय बाहेर गावी गेलेल्यांकडे घरफोडी केली. ही घटना मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास रायसोनी नगरात घडली. 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *