Headlines

Dadar Kabutar Khana : महायुती सरकारने कारवाईला स्थगिती दिली, आता दादरमध्ये कबुतरखाना वाचवायला प्रार्थना सभेचं आयोजन

Dadar Kabutar Khana : महायुती सरकारने कारवाईला स्थगिती दिली, आता दादरमध्ये कबुतरखाना वाचवायला प्रार्थना सभेचं आयोजन
Dadar Kabutar Khana : महायुती सरकारने कारवाईला स्थगिती दिली, आता दादरमध्ये कबुतरखाना वाचवायला प्रार्थना सभेचं आयोजन


Mumbai Dadar Kabutar Khana : दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असणारा कबुतरखान्याचा (Kabutar Khana) मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील कबुतरखाने बंद करण्याच्या दिलेल्या आदेशाला मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंशत: स्थगिती दिली. मुंबईतील कबुतरखाने (Kabutar Khana Mumbai) अचानक बंद करणे योग्य ठरणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. त्यामुळे तुर्तास कबुतरांना नियंत्रित स्वरुपात खाद्य पुरवत राहावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) मुंबई महानगरपालिकेला दिले होते. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर (Mahayuti Government) टीकेची झोड उठवली आहे.

एकीकडे कबुतरखान्यावरून राजकारण तापलं असताना दुसरीकडे मात्र या मुद्द्याला घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहे. आता दादरमधील ऐतिहासिक कबुतरखान्याला वाचवण्यासाठी काही दादरकर पुढे सरसावले आहे. त्या अनुषंगाने आज (6 ऑगस्ट) सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

कबुतरखान्याला वाचवण्यासाठी सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन

पुढे आलेल्या माहितीनुसार, दादरमधील ऐतिहासिक कबुतरखान्याला वाचवण्यासाठी आज सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं. सकाळी 10 वाजता ही सभा सुरु झाली. ज्यात विविध धर्मांचे धर्मगुरू आणि अनुयायी सहभागी झाले आहेत. कबुतरांना आणि कबुतरखान्याला वाचवण्यासाठी या सभेत सामूहिक प्रार्थना केली जात आहे. या कबुतरखान्याची जागा वाचवण्यासाठी नागरिकांकडून बराच काळ प्रयत्न सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेने दादर कबुतरखाना ताडपत्रीने झाकून बंद केल्यानंतर जैन समाज नाराज झाला होता. याविरोधात जैन समाजाने मोर्चाही काढला होता. तर राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही दादर कबुतरखाना बंद होऊ नये, यासाठी कंबर कसली होती. या पार्श्वभूमीवर आज या सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं.

कबुतरखान्यांना पर्यायी जागा दिल्याशिवाय ते बंद करु नये- मंत्री मंगलप्रभात लोढा 

मुंबईतील कबुतरखान्यांवर पालिकेने कारवाई सुरु केल्यामुळे जैन समाज आक्रमक झाला आहे. राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा हेदेखील कबुतरखान्यांना पर्यायी जागा दिल्याशिवाय ते बंद करु नयेत,  अशी मागणी करताना दिसत आहेत. कबुतरं नॉनव्हेज खात नाहीत, ते पडलेलं खात नाहीत, हे कबुतराचं वैशिष्ट्य आहे. आम्ही त्यांना मरु देणार नाही, ही आमची जबाबदारी आहे. लोकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे. यामध्ये काहीही दुमत नाही. जिथे लोकवस्ती कमी आहे, रेसकोर्स आहे, बीकेसी आहे, कोस्टल रोडवरील गार्डन्स आहेत, तिथे या कबुतरांची पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *