
Kabutar Khana मुंबई: मुंबईत सध्या कबुतरखान्याचा (Kabutar Khana) विषय चांगलाच तापला आहे. उच्च न्यायालयाने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे झपाट्याने आजार पसरत असल्याचं मत उच्च न्यायालयाने मांडले. मात्र कबुतरखान्यावरील या निर्णयावर मुंबईतील जैन समाज चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईतील दादरमधील कबुतरखाना हटवण्याची मागणी होत आहे. हा कबुतरखाना दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच आहे. हा कबुतरखाना दादरची ओळख बनला होता. मात्र, याठिकाणी येणाऱ्या कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात वेगाने आजार पसरत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे स्थानिकांनी कबुतरखाना बंद करण्याची मागणी सातत्याने धरुन ठेवली होती.
कबुतरांमुळे कोणते आजार होऊ शकतात? (Pigeons Dangerous For Health)
कबुतरांमुळे विविध आजार होऊ शकतात, यामध्ये श्वासाचे आजार, त्वचेचे आजार आणि पचनसंस्थेशी संबंधित आजार यांचा समावेश आहे. कबुतरांच्या विष्ठेतून आणि पिसातून पसरणाऱ्या जीवाणू, विषाणू आणि बुरशीमुळे हे आजार होतात.कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या व्याधी जडल्या होत्या. कबुतराच्या विष्ठेशी संबंधित रोगांमध्ये क्रिप्टोकोकोसिस, हिस्टोप्लाज्मोसिस आणि सिटाकोसिस यांचा समावेश होतो. विष्ठा साफ करताना तयार होणाऱ्या धुळीमध्ये श्वास घेतल्याने तुम्हाला या आजारांची लागण होऊ शकते. कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस बुरशी आढळून येते. यामुळे अॅलर्जी होऊ शकते. तसेच कबुतरांमुळे अस्थमा देखील होण्याची शक्यता असते. कबुतरांमुळे क्रिप्टोकोकोसिस, हिस्टोप्लाज्मोसिस सायटाकोसिस, साल्मोनेलोसिस, एव्हीयन माइट इन्फेस्टेशन आणि टॉक्सोप्लाज्मोसिस सारखे आजारही होण्याची शक्यता आहे.
कबुतरांमुळे होणारे आजार:
क्रिप्टोकोकोसिस (Cryptococcosis): क्रिप्टोकोकोसिस एक बुरशीजन्य आजार आहे, जी कबुतरांच्या विष्ठेतून पसरते.
हिस्टोप्लास्मोसिस (Histoplasmosis): हिस्टोप्लास्मोसिस देखील एक बुरशीजन्य आजार आहे, जी कबुतरांच्या विष्ठेतून पसरते.
सिताकोसिस (Psittacosis): सिटाकोसिस हा एक जीवाणूजन्य आजार आहे, जो कबुतरांच्या संपर्कात आल्याने होऊ शकतो.
ऑर्निथोसिस (Ornithosis): ऑर्निथोसिस हा एक जीवाणूजन्य आजार आहे, जो कबुतरांच्या विष्ठेतून आणि पिसातून पसरतो, असे NBC Environment सांगते.
ॲलर्जी (Allergies): कबुतरांच्या संपर्कात आल्याने अॅलर्जी होऊ शकते, ज्यामध्ये श्वासोच्छ्वास आणि त्वचेच्या ऍलर्जीचा समावेश आहे.
फुफ्फुसाचे आजार (Lung Diseases): कबुतरांच्या विष्ठेतील धुळीमुळे फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात.
दादरच्या कबुतरखान्याजवळ नेमकं काय घडलं?, VIDEO:
संबंधित बातमी:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
आणखी वाचा