
Chitra Wagh on Dadar Kabutar Khana: कबूतरांचा विषय हा धार्मिक नाही. लोकं मरत आहेत म्हणून मी बोलत आहे. माझ्या घरातील व्यक्ती आहे म्हणून मी बोलत नाहीये. शिवाय न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवून निर्णय घेतलाय. लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न पाहून त्याला धार्मिक रंग दिला जातोय, हे दुर्दैवी आहे. किंबहुना ज्या मंदीरासमोर आंदोलन झाले तिथेही जाळ्या लावल्या आहेत. या कबूतरांच्या विष्ठेचा त्रास जात-धर्म बघून होतं नाही. जैन मंदीराने जाळ्या काढाव्यात, कबुतरांना आत घ्या, येऊदेत मंदीरात, असे म्हणत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष व आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रीया व्यक्त केलीय.
मुंबईतील कबुतरखान्यावरुन (Kabutar Khana) सध्या जैन समाज आक्रमक झाला आहे. जैन समाजाने आज (6 ऑगस्ट) दादर कबुतरखाना (Dadar Kabutar Khana) परिसरात मोठं आंदोलन करत ताडपत्री फाडून टाकली. ययावेळी जैन आंदोलकांनी ताडपत्री, बांबूंना लावलेल्या सुतळी तोडल्या. ताडपत्री हटवून आंदोलकांनी कबुतरखाना पुन्हा सुरू केला. कबुतरखान्यावर लगेच धान्य टाकून कबुतरांना खाणंही आंदोलकांनी दिलं. जवळपास तासभर हे आंदोलन सुरू होतं. दरम्यान याच विषयावर बोट ठेवत चित्रा वाघ यांनी आंदोलकांना ओपन चॅलेंज दिलंय.
कबूतरांच्या विष्ठेचा त्रास जात-धर्म बघून होतं नाही- चित्रा वाघ
लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न पाहून त्याला धार्मिक रंग दिला जातोय, हे दुर्दैवी आहे. माझा घरचं उदाहरण देऊन ठाकरे गटाचा नेत्या किशोरी पेडणेकर ताईंनी उत्तर दिलं, स्वभावा प्रमाणे त्या बोलतील. मात्र दादरमध्ये अनेक घरांना जाळ्या आहेत. या कबूतरांच्या विष्ठेचा त्रास जात-धर्म बघून होतं नाही. हा राजकारणाचा विषय नाही, त्याला काही लोक राजकिय रंग देत आहेत. आज घडीला दादरमध्ये अनेक घरांना जाळ्या आहेत. शिवाय कबूतर तुमच्या दान्यावर नाहीत. त्यामुळे यातून तोडगा निघावा ही आमची मागणी आहे. याला धर्माचा रंग दिलेला पाहून दुःख झालं, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.
https://www.youtube.com/watch?v=78p-yoT0Zs0
संबंधित बातमी:
आणखी वाचा