Headlines

Mumbai kabutar khana: कबुतरांची पिसं आणि घाणीला कंटाळलात, मग हे पाच उपाय करा, कबुतरं आसपासही फिरकणार नाहीत

​कबुतरांना घाबरवण्यासाठी काळ्या रंगाचा फॉइल पेपर हा एक उत्तम पर्याय आहे. काळ्या फॉईलवर सूर्यप्रकाश पडल्यानंतर ती उन्हात चमकते. ही चमक पाहून कबुतरं घाबरतात. यामुळे कबुतरं तुमच्या बाल्कनीत येणार नाहीत. तुम्ही बाल्कनीत जुन्या सीडी, फॉइल किंवा कोणत्याही चकाकणाऱ्या वस्तू लटकवू शकता. जेव्हा या गोष्टी हवेत लटकतात तेव्हा त्यांच्या तीव्र प्रकाशाने कबुतरं घाबरतात.

तुमच्या गॅलरीत किंवा बाल्कनीत निवडुंगासारखी काटेरी झाडं लावल्यास कबुतरं आतमध्ये येणार नाहीत. या वनस्पतींचे काटे कबुतरांना घाबरवतात आणि ते या वनस्पतींजवळ बसणे टाळतात.

कबुतरांना काही विशिष्ट आणि तीव्र वास सहन होत नाही. तुम्ही पाण्यात व्हिनेगर, लसूण किंवा कांद्याचा रस मिसळून बाल्कनीमध्ये स्प्रे करू शकता. या मिश्रणाच्या तीव्र वासामुळे कबुतरं तुमच्या बाल्कनीत किंवा गॅलरीत फिरकणार नाहीत.

कबुतरांना घरापासून दूर ठेवण्यासाठी हमखास वापरला जाणारा उपाय म्हणजे एसी कॅबिनेट किंवा बाल्कनीच्या रेलिंगवर बर्ड स्पाइक्स बसवणे. हे स्पाइक्स असल्यास कबुतरांना एसी युनिट आणि बाल्कनीत बसता येत नाही. त्यामुळे  हळूहळू कबुतरांची तुमच्या घरात येण्याची सवय मोडते आणि नंतर कबुतरं तुमच्या घराकडे फिरकत नाहीत.

शक्य असल्यास एसी आउटडोअर युनिटभोवती मजबूत पक्ष्यांचे जाळे बसवा. हा एक कायमस्वरूपी उपाय आहे, जो केवळ कबुतरांना थांबवत नाही तर त्यांच्या घाणीपासून एसीचे संरक्षण देखील करतो.

कबुतरांना घरापासून दूर ठेवण्यासाठी बाजारात अत्यंत सूक्ष्म ध्वनीलहरी असणारी उपकरणे मिळतात. हा आवाज माणसांना ऐकू येत नाही. मात्र, अगदी लहानसा आवाजही टिपणाऱ्या कबुतरांना आणि इतर पक्ष्यांना या आवाजाचा त्रास होतो. त्यामुळे ही उपकरणे बाल्कनीमध्ये किंवा एसीजवळ बसवल्यास कबुतरं आसपास फिरकत नाहीत.

कबुतरांनी तुमच्या बाल्कनीत किंवा गॅलरीत घरटे बांधायला सुरुवात केल्यावर तातडीने त्या काटक्या काढून टाका. ती जागा साफ करा. कबुतरं त्यानंतर आणखी काहीवेळा घरटं बनवण्याचा प्रयत्न करतील. पण प्रत्येकवेळी हे घरटे काढत राहिल्यास कबुतरं दुसऱ्या जागी निवारा शोधतील.

Published at : 10 Aug 2025 01:02 PM (IST)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

आणखी पाहा

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *