Headlines

Jain Muni on Dadar Kabutar Khana: गरज पडली तर शस्त्रंही उचलू, आमच्या धर्माविरोधात जाणार असाल तर न्यायालयाला मानत नाही; जैन मुनींची धमकी

Jain Muni on Dadar Kabutar Khana: गरज पडली तर शस्त्रंही उचलू, आमच्या धर्माविरोधात जाणार असाल तर न्यायालयाला मानत नाही; जैन मुनींची धमकी
Jain Muni on Dadar Kabutar Khana: गरज पडली तर शस्त्रंही उचलू, आमच्या धर्माविरोधात जाणार असाल तर न्यायालयाला मानत नाही; जैन मुनींची धमकी


Jain Muni on Dadar Kabutar Khana: मुंबईतील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाणे टाकू नये, असा आदेश उच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर आता जैन समाज आक्रमक झाला आहे. न्यायालयाच्या बंदीनंतरही जैन समाजातील (Jain Community) व्यक्तींनी दादर कबुतरखान्याच्या परिसरात पक्ष्यांना (Kabutar Khana) खाणे टाकले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना तात्काळ इंगा दाखवला होता. त्यामुळे आता जैन समाजाने उपोषणाचे आणि आंदोलनाचे हत्यार उपसणार असल्याचे जाहीर केले आहे. येत्या 13 तारखेपासून कबुतरखाने (Dadar Kabutar Khana) बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जैन समाज उपोषणाला बसेल, अशा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय  यांनी दिला. एवढेच नव्हे तर वेळ पडल्यास शांतताप्रिय असणारा आमचा समाज शस्त्रंही हातात घेईल आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नाही, अशी धमकी जैन मुनी निलेशचंद्र विजय  यांनी दिली. 

आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग वापरणार आहोत. जैन समाज शांतताप्रिय आहे. शस्त्र उचलणे आमचं काम नाही. जे लोक शस्त्र उचलतात, ते आमचे नाहीत. पण गरज पडली तर आम्ही धर्मासाठी शस्त्रं पण उचलू. आम्ही भारताचं संविधान मानतो ना, कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना. पण आमच्या धर्माच्याविरोधात आलं तर आम्ही कोर्टालाही मानत नाही, असे निलेशचंद्र विजय  यांनी म्हटले. हे प्रकरण न्यायालयात सुरु आहे. कबुतरं मरता कामा नयेत. सरकारच्या आदेशानंतर पक्षांना खाद्य टाकणं सुरू झाले आहे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन हा सगळा प्रकार सुरु आहे. आमचं पर्युषण पर्व संपल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. आता आम्ही शांत बसणार नाही. 13 तारखेला आम्ही उपोषण सुरु करु. देशभरातली जैन बांधव आंदोलनासाठी इथे येतील. जीव दया आमच्या धर्मात आहे, जैन धर्माला का लक्ष्य केले जात आहे?  मी एकटा आंदोलनाला बसणार नाही. देशभरातली 10 लाख जैन बांधव इकडे उपोषणाला बसतील, असा इशारा निलेशचंद्र विजय यांनी दिला. दारु आणि कोंबड्या खाऊन किती लोक मरतात, हेदेखील दाखवा. आम्ही पालिकेकडे कबुतरांना खाद्य द्यायला परवानगी मागितली आहे. मुंगीपासून ते हत्तीपर्यंत कोणताही जीव मरता कामा नये, हे आमच्या धर्मात लिहिलं आहे, असेही जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. यावर आता मनसे आणि ठाकरे गट काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

आणखी वाचा

नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं! दादर कबुतरखान्याचा वाद पेटला असताना संदीप देशपांडेंच्या टी-शर्टची चर्चा

कबुतरखाना बंद झाल्यावर दादरमध्ये पक्ष्यांसाठी फिडिंग कार, मनीषा कायंदे भडकल्या, म्हणाल्या, ‘यांचा इगो हर्ट…’

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *