Headlines

Pigeon spreading diseases: कबुतरांमुळे श्वसनाचा दुर्मिळ आजार, फुफ्फुसांना डाग पडले, नामांकित रुग्णालयांनीही हात टेकले, पुण्यातील शितल मानकरांसोबत नेमकं काय घडलं?

Pigeon spreading diseases: कबुतरांमुळे श्वसनाचा दुर्मिळ आजार, फुफ्फुसांना डाग पडले, नामांकित रुग्णालयांनीही हात टेकले, पुण्यातील शितल मानकरांसोबत नेमकं काय घडलं?
Pigeon spreading diseases: कबुतरांमुळे श्वसनाचा दुर्मिळ आजार, फुफ्फुसांना डाग पडले, नामांकित रुग्णालयांनीही हात टेकले, पुण्यातील शितल मानकरांसोबत नेमकं काय घडलं?


Pune News: सध्या मुंबईतील कबुतरखान्यांच्या बंदीवरुन राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. कबुतरांची पिसं आणि विष्ठेमुळे श्वसनाचे गंभीर आजार पसरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने मुंबईतील कबुतरखान्यांच्या (Dadar Kabutar Khana) परिसरात पक्ष्यांना खाणे घालण्यास मनाई केली होती. मात्र, यानंतरही जैन समुदाय (Jain Community) कबुतरखाने वाचवण्याचा हेका सोडायला तयार नाही. कबुतरांमुळे कोणताही आजार होत नाही. आजपर्यंत कोणालाही कबुतरांमुळे त्रास झालेला नाही, इतकी वर्षे कोणालाही त्रास कसा झाला नाही, असे प्रश्न जैन समाजाकडून उपस्थित केले जात आहेत. या सगळ्यावर पुण्यातील शितल मानकर-शिंदे यांच्याबाबत घडलेला प्रकार योग्य उत्तर ठरु शकते. 

पुण्यातील शीतल मानकर – शिंदे यांना सात वर्षांपुर्वी श्वसनाचा त्रास सुरु झाला. डॉक्टरांकडे तपासणी केली असता पारव्यांमुळे फुफ्फुसांना इजा झाल्याच निदान झाले. त्यानंतर पुण्यातील मंगेशकर हॉस्पीटल , पुना हॉस्पिटल , डी वाय पाटील हॉस्पिटल , मुंबईतील लिलावती हॉस्पिटल अशा अनेक हॉस्पिटलमधे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, शीतल यांच्या फुफ्फुसांना पडलेले डाग वाढत गेले. खोकल्याची उबळ आल्याने रात्रभर त्यांना झोप यायची नाही. बाहेर जाताना ऑक्सीजनचा सिलेंडर त्यांना सोबत ठेवावा लागायचा. अखेर यावर्षी १९ जानेवारीला पुण्यातील डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारादरम्यांन वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी त्यांच निधन झालं. पारव्यांना दाणे टाकण्याचा आग्रह धरणाऱ्यांच्या डोळ्यात शीतल मानकर –  शिंदे  यांचा  वेदनाई मृत्यू अंजन घालेल अशी अपेक्षा आहे. 

सात वर्षांपूर्वी शीतल यांना अचानक श्वसनाचा त्रास सुरु झाला . पुण्यातील डॉक्टरांनी पारव्यांमुळे शीतल यांच्या फुफुसांना संसर्ग झाल्याचं निदान  केलं आणि उपचारांना सुरुवात केली . शीतल ज्या सोसायटीत राहायच्या त्या सोसायटीतील काहीजणांनी त्यानंतर देखील पारव्यांना दाणे टाकणं सुरूच ठेवल्याने त्यांच्या कुटुंबाने  घर बदलायचं ठरवलं . मात्र, तरीही शीतल यांचा त्रास वाढतच गेला, असे त्यांचे वडील शाम मानकर यांनी सांगितले. शीतल यांना खोकल्याची उबळ आली की रात्रभर थांबायची नाही . उशीला टेकून बसत त्यांना रात्र काढायला लागायची . शीतलच्या त्या वेदना आठवल्या की आजही माझ्या डोळ्यात पाणी येते, असे  शाम मानकर यांनी सांगितले.  

Pune News: नामांकित रुग्णालयांनी शीतल यांच्या आजारापुढे हात टेकले

फक्त पुण्यातीलच नव्हे तर मुंबईतील नावाजलेल्या हॉस्पिटल्समध्ये शीतल यांच्यावर उपचार करण्यात आले . एवढंच नाही तर हवापालटासाठी म्हणून कधी मुंबई तर कधी गोवा असा त्यांचा प्रवास असायचा . मात्र,  दिवसेंदिवस आजार बळावत चालला होता . सोबत ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली होती .  मानकर आणि शिंदे कुटुंबीय शीतल यांना  बरं वाटावं यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत होते  अखेर १९ जानेवारीला  शीतल यांचा आजाराबरोबरचा संघर्ष थांबला . उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला 

शीतल यांचे वडील  शाम मानकर हे पुण्यातील प्रथितयश हॉटेल व्यवसायिक आहेत . पुण्याच्या सार्वजनिक जीवनात ते अनेक वर्षे कार्यरत आहेत. आपल्या मुलीला अशाप्रकारे आलेल्या मृत्यूच्या आठवणीने ते आजही व्याकुळ होतात आणि पारव्यांना दाणे टाकणाऱ्यांना ते हात जोडून दाणे न टाकण्याची विनंती करतायत . 

कबुतर म्हणून पारव्यांना दाणे टाकण्यावरून निर्माण झालेल्या वादाला कधी धार्मिक रंग दिला जातोय तर कधी प्रांतिक अस्मितेशी त्याला जोडलं जातंय . काहीजण राजकीय पोळी भाजून घेणाचाही प्रयत्न करतायत . मात्र पारव्यांची कोरडी विष्ठा जर कोणाच्या फुफुसांमध्ये गेली तर मानकर – शिंदे कुटुंबासारखी वेळ कोणावरही येऊ शकते, याची जाणीव या सर्वांनी ठेवण्याची गरज आहे . 

मानकर – शिंदे कुटुंबाच्या वाट्याला जे आलं ते इतर कोणाच्याही वाट्याला येऊ नये यासाठी भूतदया म्हणून जे पक्षांना  दाणे टाकतायत त्यांनी थोडीशी भूतदया मानवासाठी देखील राखून ठेवण्याची गरज आहे . निसर्ग त्याच्या परीने संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असतो . मात्र, कोणत्याही प्राणी किंवा पक्षाची सांख्य जेव्हा प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा हे संतुलन बिघडते . शिकल्या – सावरल्या लोकांनी हे समजून घेणायची गरज आहे . मानकर – शिंदे परिवाराचं उदाहरण सर्वांच्या समोर आहे.

आणखी वाचा

भसाभसा धान्य खाणारे ते थवे कबुतरांचे नव्हे तर पारव्यांचे, मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक का?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *