
मुंबई: देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुंबई पोलिसांकडून विशेष सलामी दिली जाते. मात्र यंदा मध्य प्रदेश पोलिसांकडून ही पथसंचलन करुन सलामी दिली, यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टीवरती भाष्य केलं आहे. फडणवीस म्हणाले, देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखालील आपण प्रगती करतोय. 11 व्या अर्थव्यवस्थेपासून ते 4 व्या अर्थव्यवस्थेपर्यंत आपण मजल मारली आहे. विविध क्षेत्रात भारत प्रगती करतोय. स्पेसच्या क्षेत्रात भारताने आपलं पाऊल टाकलंय, अशात ही विकासगाथा आता थांबणार नाही. भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागतील, जगातील ज्या व्यवस्था आहेत, त्या व्यवस्था भारतात उभ्या कराव्या लागतील, गुणवत्तेनं त्या व्यवस्था तयार कराव्या लागतील, भारतात समर्थपणे त्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील, त्या दृष्टीने आपली वाटचाल चालली आहे, असंही फडणवीस यांनी पुढे म्हटलं आहे.
शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळेल
पुढे ते म्हणाले की, स्वदेशी जिथे शक्य असेल, अशात आत्मनिर्भर भारताला बळकटी द्यायची आहे. महाराष्ट्राने विकसित भारताच्या विकासात भर टाकण्याचे काम केले आहे. 40 टक्के एफडीआय आपल्याकडे आलेली, रोजगार निर्मिती होते आहे, निर्यातीत, स्टार्टअपमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. शिक्षणाची व्यवस्था आणि महाराष्ट्राने सुरु केलेले प्रयत्न अशात मानव संसाधन महाराष्ट्र नेतृत्व देईल. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसा वीज मिळाली पाहिजे, सौर वाहिनी अंतर्गत प्रकल्प सुरु आहे, अशात शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळेल. एआयचा वापर करत शेतीचं क्षेत्र कसं फायद्याचे होईल असा प्रयत्न देखील आपण करत आहोत.आपलं राज्य हरित तयार होईल. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पाणी आणण्याचे काम करतोय असंही फडणवीस पुढे म्हणाले आहेत.
देशाचे नवीन स्टील हब म्हणून गडचिरोली
गडचिरोलीत जवळपास नक्षलवाद मुक्त केले आहे. देशाचे नवीन स्टील हब म्हणून गडचिरोली तयार होत आहे. देशातील सर्वात मोठी स्टील कपॅसिटी तयार होणार आहे. इन्फ्राचे प्रकल्प हातात घेतले आहेत. वाढवण सारखे बंदर बांधतोय, जे महाराष्ट्र आणि भारताला मोठं करणार आहे. विमानतळांना आधुनिक करणं किंवा नवे विमानतळ बांधण्याचे काम करतोय. रस्ते गावगावात नेत विकास करण्याचा प्रयत्न करतोय, भारताच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर असणार आहे, जनतेचं अभिनंदन आणि शुभेच्छा देतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी, संतांनी दाखवलेल्या मार्गावर आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर महाराष्ट्र चालत राहिल याची ग्वाही देतो, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा