Maharashtra Rain : राज्यात पुन्हा एकदा मान्सून (Monsoon) ॲक्टिव्ह झाला आहे. पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबईत आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर उद्या आणि परवा मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार रायगडमध्ये उद्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसरात देखील उद्यापासून धुंवाधार पाऊस पडणार आहे. विदर्भात विजांच्या कडकटासाह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांत आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात गेल्या अनेक दिवासांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने बहुतांश जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने (IMD forecast) विदर्भ, मराठवाडा, कोकणसह, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
15 ऑगस्ट : रत्नागिरी व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ ,वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हाही पावसाचा ऑरेंज अलर्ट
यलो अलर्ट : रायगड ,मुंबई, ठाणे,पुणे कोल्हापूर घाटमाथा, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड व नागपूर
16 ऑगस्ट : रायगड, रत्नागिरी तसेच पुणे सातारा व कोल्हापूरच्या घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून बुलढाणा, अकोला, अमरावती आपल्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.
यलो अलर्ट : मुंबई, पालघर ,ठाणे, नाशिक व नाशिक घाटमाथा, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. पावसात बाहेर पडताना खबरदारी घ्या.विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्या जागेत उभं राहणं टाळा, नदी-नाल्याजवळ जाणं टाळा अशी सूचना देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Weather Update: राज्यभरात पुन्हा पावसाची उसंत; मुंबईसह उपनगरात आज धुव्वाधार पाऊस बरसणार; अनेक जिल्ह्यांना हायअलर्ट, IMDचा अंदाज काय?
आणखी वाचा