Headlines

Mumbai Rain : मुंबईला रेड अलर्ट, मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली, लोकल सेवेला फटका; दादर- सायनमध्ये पाणी साचलं

Mumbai Rain : मुंबईला रेड अलर्ट, मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली, लोकल सेवेला फटका; दादर- सायनमध्ये पाणी साचलं
Mumbai Rain : मुंबईला रेड अलर्ट, मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली, लोकल सेवेला फटका; दादर- सायनमध्ये पाणी साचलं


Mumbai Rain News : मुंबईसह मुंबई उपनगर आणि लगतच्या परिसरात जोरदार पावसाच्या (Heavy Rain) सारी कोसळत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी आज (16 ऑगस्ट) ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. सोबतच नागरिकांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने मुंबईकरांना केलं आहे. दरम्यान, मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वेमार्गावरील विद्याविहार आणि कुर्ला या स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे रुळ पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याचीही शक्यता आहे. याशिवाय, दादर परिसरातही रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे.

कुर्ला आणि विद्याविहार दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

मुंबईतील कुर्ला आणि विद्याविहार दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे प्रशासनाने पाणी काढण्यासाठी पंप लावले असले तरी पाण्याचा निचरा होत नव्हता. यामुळे लोकल ट्रेनची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. फास्ट ट्रॅकवरील गाड्या स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या आहेत. मुंबईकरांना सकाळी कामावर जाताना याचा त्रास सहन करावा लागत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आज शहरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे येथील रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली आलेला आहे. परिणामी रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने प्रवाशांना अडचणी येत आहेत.

पावसामुळे लोकलसेवेला फटका, लोकल 20 ते 25 मिनिटांनी उशिराने

मिळालेल्या माहितीनुसार, विद्याविहार ते सायन दरम्यान रुळांवर पावसाचे पाणी साचले होते, आता पाऊस कमी झाल्याने पाण्याचा निचरा होऊ लागला आहे, तरीही लोकलची वाहतूक अजून 20 ते 25 मिनिटांनी उशिराने सुरु आहे. तर ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावरील वाहतूक देखील 20 मिनिटे उशिराने सुरू आहे, दुसरीकडे, कल्याण रेल्वे सेवा सुरळीत असल्याची माहिती समोर आली आहे. यातील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरु असल्याची माहिती कल्याण स्टेशनच्या रेल्व अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन

मुंबईतील पावसाचा अंदाज लक्षात घेता मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, “मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे आणि रेड अलर्ट लागू आहे. अनेक भागात पाणी साचल्याची आणि दृश्यमानता कमी झाल्याची नोंद झाली आहे. मुंबईकरांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच पोलिसांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच मुंबईकरांना मदत करण्यास सज्ज आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, 100/112/103 वर डायल करा.”असेही पोलिसांनी जाहीर केलं आहे.

आणखी वाचा

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *