
Mumbai Crime Goregaon Suicide: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव परिसरात एका प्रख्यात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलीने इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या (Suicide News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीने 14 ऑगस्टला दुपारी आई-वडील घराबाहेर गेले असताना इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्याचा शेवट केला. ही मुलगी गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या ओबेरॉय स्क्वायर (oberoi esquire building) या इमारतीमध्ये वास्तव्याला होती. ती मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ती अकरावीला होती. या मुलीचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून ती त्यांची एकुलती एक मुलगी होती. या मुलीने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांना (Mumbai Police) तिच्या खोलीत किंवा इतरत्र कुठेही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी याप्रकरणात अपमृत्यूची नोंद केली आहे. (Mumbai Shocking News)
प्राथमिक माहितीनुसार, ही मुलगी गुरुवारी दुपारी तिच्या बेडरुममध्ये होती. या मुलीचे आई-वडील बाहेर गेले होते. तिचे आजी-आजोबा घरात होते. दुपारी साडेतीन वाजता अचानक तिने बेडरुमच्या खिडकीतून खाली उडी मारली. उंचावरून खाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. इमारतीच्या रिसेप्शनिस्टने तिला पोडियमवर पडताना पाहिले. ती येत्या काही दिवसांमध्ये शिक्षणासाठी लंडनला (London) जाणार होती. तेथील एका विद्यापीठात तिला प्रवेश मिळाला होता. ती लंडनला जाण्यासाठी 15 दिवस बाकी होते. मात्र, त्यापूर्वीच तिने हे टोकाचे पाऊल का उचलले, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या मुलीला गेल्या काही वर्षांपासून डिप्रेशनचा (Deperssion) आजार होता. नैराश्याशी झुंजत असल्यामुळे तिच्यावर अंबानी रुग्णालयात उपचारही सुरु होते. ही मुलगी ज्या इमारतीमध्ये राहत होती त्या इमारतीमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत ओबेरॉय स्क्वायर संकुलातील विविध इमारतींमध्ये आत्महत्या होण्याची ही चौथी घटना आहे. मे महिन्यात 17 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या आयुष्याची अखेर केली होती, तर जुलै महिन्यात 22 वर्षीय अनंत द्विवेदीने आत्महत्या केली होती. यामागील नेमके कारण समोर आले नसले तरी या घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे.
आणखी वाचा
25 व्या मजल्यावरुन घेतली उडी, 11 वीत शिकणाऱ्या मुलीनं संपवलं जीवन, धक्कादायक घटनेनं गोरेगाव हादरलं
आणखी वाचा