Headlines

मोठी बातमी : मुंबईतील दहीहंडीदरम्यान मोठी दुर्घटना, एका गोविंदाचा मृत्यू, अनेक जखमी

मोठी बातमी : मुंबईतील दहीहंडीदरम्यान मोठी दुर्घटना, एका गोविंदाचा मृत्यू, अनेक जखमी
मोठी बातमी : मुंबईतील दहीहंडीदरम्यान मोठी दुर्घटना, एका गोविंदाचा मृत्यू, अनेक जखमी


मुंबई : राजधानी मुंबईत दहीहंडी (Dahihadi) उत्सवाचा मोठा जल्लोष पाहायला मिळत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक राजकीय नेते दहीहंडी उत्सवात सहभागी होत गोविंदाचा उत्साह वाढवत आहेत. दुसरीकडे अभिनेते, सेलिब्रिटीही आणि नृत्यांगणा गौतमी पाटीलचाही जलवा पाहायला मिळत आहे. उंचच उंच मनोरे रचत गोविंदा पथके नव्याने विक्रमही रचत आहेत. एकीकडे गोविंदा पथकांनी विक्रमांचे मनोरे रचले असताना दुसरीकडे मुंबईतील (Mumbai) मानखुर्द एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे, दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले असून दहीहंडीचा रोप बांधताना हा अपघात (Accident) झाल्याची माहिती आहे.  

मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून बाल गोविंदा पथकातील 32 वर्षीय गोविंदाला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील ही दुर्घटना असून दहिहंडी रोप बांधताना तोल गेल्याने गोविंदाचा खाली पडून अपघात झाला. या दुर्घटनेनंतर जखमी अवस्थेतील गोविंदाला गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या अपघाताच्या घटनेनं दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले असून बाल गोविंदा पथकावर शोककळा पसरली आहे. 

30 गोविंदा जखमी

मुंबईतील दहीहंडी उत्सावात सकाळपासून 30 गोविंदा जखमी झाले असून एका गोविंदाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानखुर्द येथे दुपारी 3 वाजता गोविंदाच्या अपघाताची घटना घडली. जगमोहन शिवकुमार चौधरी (32 वर्षे) असं मृत्यूमुखी पडलेल्या गोविंदाचे नाव आहे. जखमी झालेल्या 30 गोविंदांपैकी प्राथमिक उपचारानंतर 15 गोविंदाना आलं घरी सोडण्यात आलं आहे. तर, अद्यापही 15 गोविंदा उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहेत. 

हेही वाचा

मुंबई महापालिकेत विकासाची हंडी लागली जाईल, पापाची हंडी आम्ही फोडली; मुख्यमंत्र्यांनी रणशिंग फुंकले

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *