कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक क्षण!
महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू करण्यास मान्यता दिली असून त्याचे उद्घाटन रविवार, १७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २:३० वाजता होणार आहे. हा सोहळा मेरी वेदर ग्राऊंड, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे पार पडणार आहे.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर…
मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. भूषण गवई साहेब
मा. मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायमूर्ती
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
तसेच इतर मान्यवर

सर्किट बेंच सुरू होण्याचे महत्त्व…
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील नागरिकांसाठी आता उच्च न्यायालयीन कामकाजासाठी मुंबईला धाव घ्यावी लागणार नाही.
सर्किट बेंच सुरू झाल्यामुळे –
वेळ, खर्च आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे
स्थानिक पातळीवरच न्याय मिळणे सुलभ होईल
न्यायप्रक्रियेत गती येईल
थेट प्रक्षेपण..
या ऐतिहासिक सोहळ्याचा प्रत्येक नागरिकाने लाभ घ्यावा, यासाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
👉 थेट प्रक्षेपण येथे पाहू शकता:
👉 थेट प्रक्षेपण येथे पाहू शकता: