Mumbai Fire : मुंबईच्या (Mumbai ) मालाड पश्चिमेत सोमवार बाजारमध्ये एका दुकानासा मोठी आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुकानाला ही आग लागली आहे. ही मोठी असून दुकान आगीत जळून खाक झालं आहे. आगीची माहिती मिळतच अग्निशामक दलाच्या सहा ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.
आजूबाजूला मोठ्या संख्येनं दुकाने असल्यामुळं आग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसून, दुकान जळून खाक झालं आहे. आग कशामुळं लागली या संदर्भात अग्निशामक दलाचे जवान आणि मालाड पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या दुकानाला ही आग नेमकी कशी लागली? शॉर्ट सर्किट झाले की आणखी काय झाले? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.
महत्वाच्या बाताम्या:
Ratnagiri Accident Kashedi ghat: रत्नागिरीच्या कशेडी घाटाजवळ अपघात, मुंबईवरुन निघालेली लक्झरी बस जळून खाक
आणखी वाचा