Headlines

Eknath Shinde On Raj And Uddhav Thackeray: फडणवीस व्हिजनरी, अजितदादा रोखठोक; राज अन् उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले?; एकनाथ शिंदेंचा रोखठोक रॅपिड फायर

Eknath Shinde On Raj And Uddhav Thackeray: फडणवीस व्हिजनरी, अजितदादा रोखठोक; राज अन् उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले?; एकनाथ शिंदेंचा रोखठोक रॅपिड फायर
Eknath Shinde On Raj And Uddhav Thackeray: फडणवीस व्हिजनरी, अजितदादा रोखठोक; राज अन् उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले?; एकनाथ शिंदेंचा रोखठोक रॅपिड फायर


Eknath Shinde On Raj And Uddhav Thackeray मुंबई: मुंबई महापालिका महायुतीच जिंकणार, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. तसेच राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही, असा विश्वास देखील एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. मुंबईसाठी महायुती सरकारने जे निर्णय घेतले तसे निर्णय कोणीही घेतले नाहीत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

राजकारणामधे कुणीही कुणाही बरोबर जाऊ शकतं. तो त्यांचा निर्णय आहे. ही आमची युती आहे. आम्ही तिघांनी एकत्र येऊन विधानसभा जिंकली आणि हे सत्य आहे. त्यामुळे मुंबई महापालिका आम्हीच जिंकणार, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. आमच्या सरकारनं मुंबईसाठी जे निर्णय घेतले ते सगळे मुंबईकरांच्या हिताचे आहेत. मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे, तो आम्ही मुंबईत परत आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पात मुंबईला मोठे आर्थिक सहाय्य केले. विधानसभेत लोकांनी कामाला पोचपावती दिली आणि आम्हाला बहुमत दिलं. कुटुंब, परिवार, भाऊ एकत्र आले तर चांगलंच आहे. राजकारण राजकारणाच्या जागेवर, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले. 

आम्ही दिल्लीला इतरांसारखे लपून-छपून जात नाही- एकनाथ शिंदे

मी दिल्लीला गेलो, गावी गेलो तरी लोकांना पोटदुखी होते. मला अनेकवेळा इतर राज्यांतील प्रमुखांना भेटावे लागते. राज्यासाठी काही मागायचे असेल तर दिल्लीला जावे लागणे, यात गैर काय?, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे राज्याला मदत करत असतात. आम्ही दिल्लीला इतरांसारखे लपून-छपून जात नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक महिल्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. हा निधी देण्यासाठी थोडीफार कसरत करावी लागते. त्याचवेळी राज्यात जे पायाभूत कामं सुरू आहे. त्यांच्यातूनही पैसा जमा होतो. आम्ही जो बोललो आहे, ते आम्ही देणारच, प्रिंटींग मिस्टेक म्हणणार नाही, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला. 

एकनाथ शिंदेंना या मुलाखतीत रॅपिड फायरद्वारे काही प्रश्नही विचारण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत एका शब्दांत वर्णन करा, असं एकनाथ शिंदेंना या रॅपिड फायरमध्ये सांगण्यात आले. यावर एकनाथ शिंदेंनी कोणती उत्तरं दिली, जाणून घ्या…

रॅपिड फायद राऊंडमध्ये एकनाथ शिंदेंनी दिलेली उत्तरं-

1. अमित शाह- चाणक्य
2. देवेंद्र फडणवीस – मित्र, सहकारी, व्हिजनरी
3. अजित पवार – रोखठोक, चांगले मित्र
4. उद्धव ठाकरे – त्यांना विचारा
5. राज ठाकरे – मैत्री आहे, आता कमी आहे..मात्र अजूनही संबंध आहेत.

संबंधित बातमी:

Ajit Pawar Call IPS Anjana Krishna: मै अ‍ॅक्शन लूंगा, इतनी डेरिंग तुम्हारी…, दादा भडकले; अजित पवारांना नडणाऱ्या अंजली कृष्णा कोण?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *