उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. लालबागच्या राजाचे यंदा ९१वे वर्ष आहे. अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला त्यांनी हे दर्शन घेतले. उद्या सकाळपासून लालबागच्या राजाच्या विसर्जनाची मिरवणूक सुरू होईल. मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये लालबागच्या राजाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. गेले दहा दिवस येथे प्रचंड गर्दी होती. अनेक भक्तगण आणि भाविक तासनतास रांगेत उभे राहून लालबागच्या राजाचे दर्शन घेत असतात. अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेही गेले दहा दिवस लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत आहेत. एकनाथ शिंदे यांनीही आपल्या कुटुंबासह या ठिकाणी उपस्थिती लावली.
Source link
New Thinking, New Style, Super Coverage