Headlines

Mumbai Ganesh Visarjan : मुंबईतील 'या' 39 फूट उंच गणेश मूर्तीचे विसर्जन होणार नाही, चौपाटीवरून बाप्पा पुन्हा मंडपात नेणार, नेमकं कारण काय?

Mumbai Ganesh Visarjan : मुंबईतील 'या' 39 फूट उंच गणेश मूर्तीचे विसर्जन होणार नाही, चौपाटीवरून बाप्पा पुन्हा मंडपात नेणार, नेमकं कारण काय?
Mumbai Ganesh Visarjan : मुंबईतील 'या' 39 फूट उंच गणेश मूर्तीचे विसर्जन होणार नाही, चौपाटीवरून बाप्पा पुन्हा मंडपात नेणार, नेमकं कारण काय?


Mumbai Ganesh Visarjan मुंबई: राज्यभरात आज (6 सप्टेंबर) आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला (Ganesh Utsav 2025) निरोप देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वत्र मोठी धामधून सुरु असून पोलीस आणि स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे. अशातच दक्षिण मुंबईतील समुद्र चौपाटीवर गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. दरम्यान मुंबईतील गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चोख बंदोबस् तैनात केला आहे. दरम्यान, मुंबईतील बहुतांशी सगळ्या गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीचे आज शनिवारी (6 सप्टेंबर रोजी) विसर्जन होणार असले तरी दक्षिण मुंबईतील एक गणेशमूर्ती अशी आहे जिचे विसर्जन होणार नाहीये. तर या गणरायाच्या मूर्तीबर जलाभिषेक करून ही मुर्ती पुन्हा चौपाटीवरून मंडपातच नेली जाणार आहे आणि हीच मूर्ती पुढच्या वर्षी नव्या स्वरुपात स्थापन केली जाणार आहे. गिरगावातील सुतारगल्ली येथील गणेशोत्सव मंडळाने एक नवीनच प्रयोग यंदा केला असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा या मागचा या मंडळाचा मानस आहे.

जलाभिषेक करून हि मूर्ती पुन्हा मंडळात नेली जाणार

दक्षिण मुंबईतील गिरगाव परिसरातील सी. पी. टैंक परिसरातील पहिली सुतारगल्ली येथील गणेशोत्सव मंडळाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा एक आगळा वेगळा आणि नवा संदेश देणारा अभिनव उपक्रम राबवला आहे. आज (शनिवारी) अनंत चतुर्दशी असून मुंबईतील बहुतांशी सर्व गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन पार पडणार आहे. मात्र सुतारगल्ली येथील गणेशोत्सव मंडळ याला अपवाद ठरले आहे. कारण या मूर्तीचे आज समुद्रात किंवा कुठेही जलस्रोतात विसर्जन होणार नाही. तर या मूर्तीवर केवळ जलाभिषेक करून हि मूर्ती पुन्हा मंडळात नेली जाणार आहे. तर पुढील वर्षी तीच मूर्ती पूजेसाठी वापरली जाणार आहे. पीओपी आणि पर्यावरणपूरक मूर्तीच्या न्यायालयीन वादाच्या पार्श्वभूमीवर या मंडळाने यंदा फायबरची मूर्ती स्थापन केली आहे. विशेष म्हणजे तब्बल 39 फूट उंच हि मूर्ती असून ती हुबेहूब पीओपीच्या मूर्तीसारखी दिसते.

दरवर्षी मूर्ती नव्या रुपात सादर करण्यात येणार

दरम्यान, हि फायबरची मूर्ती असल्याने तिच्यावर पाण्याचा कुठलाही परिणाम होत नाही. शिवाय हि मूर्ती पीपीच्या आणि मातीच्या मूर्तीपेक्षा अधिक मजबूत आणि टिकाऊ असते. त्यामुळे तिचा पुनर्वापर करणे अधिक सोप्पं आहे. दरवर्षी केवळ मूर्तीला रंगरंगोटी करणे, मूर्तीचे अवशेष नवीन स्वरुपात जोडणे हे बदल करून मूर्ती नव्या रुपात सादर करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन सांगळे यांनी सांगितले.

हेही वाचा :           

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *