Headlines

Raj Thackeray & Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे राज ठाकरेंना सर्वात मोठा मान देण्याच्या तयारीत, दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर स्टेजवर बोलावणार?

Raj Thackeray & Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे राज ठाकरेंना सर्वात मोठा मान देण्याच्या तयारीत, दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर स्टेजवर बोलावणार?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे राज ठाकरेंना सर्वात मोठा मान देण्याच्या तयारीत, दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर स्टेजवर बोलावणार?


Raj Thackeray & Uddhav Thackeray: येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात एक मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हेदेखील दिसू शकतात. ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शनिवारी ‘एबीपी माझा’शी बोलताना यासंदर्भातील संकेत दिले. दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते, असे सचिन अहिर यांनी म्हटले. सचिन अहिर हे शनिवारी ‘एबीपी माझा’च्या न्यूजरुममधील गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दिलेल्या छोटेखानी मुलाखतीत ठाकरे बंधूंच्या राजकीय मिलनाविषयी महत्त्वाची टिप्पणी केली.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे, ही केवळ दोन पक्षांची गरज नसून ते राज्यासाठी गरजेचे आहे. ही लोकांच्या मनातील भावना आहे. आता गणपती संपल्यानंतर पितृपक्ष सुरु होत आहे. त्यामुळे आता दसऱ्याला चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे. दसरा मेळाव्यात आमचे नेते सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्याला सामोरे कसे जायचे, याविषयी मार्गदर्शन करतील. दसरा मेळाव्यातून कार्यकर्त्यांना दिशा द्यायची असते. त्यामुळे हा मेळावा राजकीय आणि सामाजिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे, असे सचिन अहिर यांनी म्हटले. राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ हे एकमेकांना कायम बघत असतात. दसरा मेळाव्याला हे दोघे स्टेजवर एकत्र येतील, का माहिती नाही. पण आम्ही त्यांना आमंत्रित करु शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. आमच्याप्रमाणे त्यांचाही मेळावा असतो. त्यामुळे तेदेखील आम्हाला आमंत्रित करु शकतात, असे सचिन अहिर यांनी म्हटले. पक्षाचं आणि आघाडीचं व्यासपीठ वेगळं असतं. परंतु, यावेळचा शिवतीर्थवरील दसरा मेळावा हा ‘न भूतो न भविष्यती’, स्वरुपाचा असेल, असे संकेत सचिन अहिर यांनी दिले.

Shivsena & MNS: मुंबईत मराठी माणसाचं अस्तित्वं टिकवण्यासाठी दोन्ही भावांनी एकत्र येणं गरजेचं: सचिन अहिर

गेल्या काही वर्षांपासून मुंबईची भौगोलिक परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ही मराठी माणसासाठी अस्तित्त्वाची लढाई असेल. मी 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत होतो. पण तेव्हा आम्हाला कधीही शिवसेनेसारखा पक्ष नसावा, असे वाटले नाही. राज्यात आपण नेतृत्व करतोय. पण महानगरपालिका शिवसेनाच चांगली चालवू शकते, हे आम्हाला वाटत होते. मुंबईचे स्वरुप आता बदलत चालले आगे. त्यामुळे मुंबईत आता मराठी माणूस टिकवायचा असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन नेृतृत्त्व करणे, ही काळाजी गरज आहे, असे मत सचिन अहिर यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा

उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर आले, ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या बाळा नांदगांवकरांची भावनिक पोस्ट

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *