Headlines

बोरिवली स्टेशनवर  फिल्मी स्टाईलने साडेचार लाख रुपयांची लूट, सीसीटीव्हीचा वापर करुन पोलिसांनी केलं सहा आरोपींना अटक 

बोरिवली स्टेशनवर  फिल्मी स्टाईलने साडेचार लाख रुपयांची लूट, सीसीटीव्हीचा वापर करुन पोलिसांनी केलं सहा आरोपींना अटक 
बोरिवली स्टेशनवर  फिल्मी स्टाईलने साडेचार लाख रुपयांची लूट, सीसीटीव्हीचा वापर करुन पोलिसांनी केलं सहा आरोपींना अटक 



Mumbai Crime News : मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर साडेचार लाख रुपयांची फिल्मी स्टाईलने लूट करण्यात आली होती. मात्र, जीआरपी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही आणि सूत्रांचा वापर करून सहा आरोपींना अटक केली आली. अटक केलेल्या आरोपींकडून 2 लाख 85  हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

अहमद शेख (32), मंगलराज राय (28), तानाजी माने (30), राजू शेख (26), कृष्णा कानजोडकर (40) आणि सुरेश कुलकर्णी (56) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेले आरोपी मुंबई आणि ठाण्याचे रहिवासी आहेत. सर्व आरोपींवर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 11 सप्टेंबर रोजी सहा चोरांनी बोरिवली स्टेशनवर तक्रारदाराचा स्टेशनभोवती पाठलाग करून फिल्मी स्टाईलने साडेचार लाख रुपयांची लूट केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बोरिवली जीआरपीने गुन्हा दाखल केला आणि तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज वापरुन तपास सुरू केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुंबई आणि ठाण्यातील असल्याचे उघड झाले. बोरिवली जीआरपीने मुंबई आणि ठाण्यातून सहा संशयितांना अटक केली. अटक केलेल्या संशयितांनी अशाच पद्धतीने रेल्वे दरोडे टाकलेत का याची चौकशी सुरु आहे. बोरिवली जीआरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता खुपरेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *