Headlines

भारतात पाकिस्तानमधून अमंली पदार्थांचा पुरवठा, मुख्य आरोपी अटकेत, 8 कोटी 4 लाखांचा मुद्देमाल जप्त 

भारतात पाकिस्तानमधून अमंली पदार्थांचा पुरवठा, मुख्य आरोपी अटकेत, 8 कोटी 4 लाखांचा मुद्देमाल जप्त 
भारतात पाकिस्तानमधून अमंली पदार्थांचा पुरवठा, मुख्य आरोपी अटकेत, 8 कोटी 4 लाखांचा मुद्देमाल जप्त 



Mumbai Crime news  : पाकिस्तानातून भारतात हेरॉईन नावाचे अमंली पदार्थ सप्लाय करणाऱ्या मुख्य सूत्रधारला बेड्या ठोकण्यात विरार गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाला मोठे यश आले आहे. अफगाणिस्तान वरुन पाकिस्तान मार्गे थेट भारतात हे अमंलीपदार्थ सप्लाय करीत  असल्याचे मोठ्या रॅकेटचा यात भांडाफोड झाला आहे. आरोपीला वसई न्यायालयात हजर केले असता 2 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

 8 कोटी 4 लाख 40 हजार किंमतीचा 2 किलो 11 ग्रॅम वजनाचा हेरॉईन जप्त

फादरवाडी रेंजनाका रस्त्यावरील श्रीपाल टॉवर येथे सापळा रचून 8 कोटी 4 लाख 40 हजार किंमतीचा 2 किलो 11 ग्रॅम वजनाचा हेरॉईन नावाचा अमली पदार्थ जप्त करून तीन आरोपीना अटक केले होते.  समुंदरसिंग देवडा (वय 49), युवराजसिंग राठोड (वय 28 ), तकतसिंग राजपूत (वय 38) असे  अटक केलेल्या आरोपींची नाव होती. या आरोपींचा कसून तपास केला असता,  अमंलीपदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार राजस्थान मधील असल्याचे समोर आले आहे. 

अमली पदार्थांचा पुरवठा पाकिस्तानातून होत असल्याची कबुली 

विरार गुन्हे शाखा कक्ष 3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक।पोलीस निरीक्षक सुहास कांबळे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ राजस्थान मध्ये जाऊन सापळा रचून 25 सप्टेंबर रोजी सिरोही येथून मुख्य सूत्रधार हरिसिंह तेजसिंह रावलोटी भाटी याला अटक केले. अटक करण्यात आलेला हरिसिंह हा आरोपी हा भारत पाकिस्तान सीमेलगत असलेल्या सतू या गावात राहतो. या अमली पदार्थांचा पुरवठा पाकिस्तानातून होत असल्याची कबुली त्याने पोलिसांना तपासा दरम्यान दिली आहे. हा आरोपी पाकिस्तान मधील अमली पदार्थ पुरवठा दारांच्या संपर्कात असून जेसेलमेर सीमेजवळून हा तस्करी करीत होता असे विरार गुन्हे शाखा कक्ष 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे यांनी सांगितले आहे. पोलिसांनी श्रीपाल टॉवर येथे सापळा रचून ही कारवाई केली आहे. यावेळी आरोपींकडून 8 कोटी 4 लाख 40 हजार किंमतीचा 2 किलो 11 ग्रॅम वजनाचा हेरॉईन नावाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी तीन आरोपीना अटक केली आहे. अफगाणिस्तान वरुन पाकिस्तान मार्गे थेट भारतात हे अमंलीपदार्थ सप्लाय करीत  असल्याचे मोठ्या रॅकेटचा यात भांडाफोड झाला आहे. त्यामुळं या घटनेनत आणखी कोण सामील आहे का? याचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Pakistani Drone: अमृतसरमध्ये तस्करीचा प्रयत्न ‘बीएसएफ’ने हाणून पाडला, 3.2 किलो हेरॉईन जप्त

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *