Headlines

मोठी बातमी : ZP आणि पंचायत समितीची आरक्षण सोडत ठरली, उमेदवारांनो तयारीला लागा!

मोठी बातमी : ZP आणि पंचायत समितीची आरक्षण सोडत ठरली, उमेदवारांनो तयारीला लागा!
मोठी बातमी : ZP आणि पंचायत समितीची आरक्षण सोडत ठरली, उमेदवारांनो तयारीला लागा!



Zilla Parishad Election : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आरक्षण सोडत कधी होणार? असा सवाल करण्यात येत होता. अखेर याबाबतची प्रतीक्षा संपली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत असणार आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) केली आहे. त्याचबरोबर नगरपरिषद, नगरपंचायतींची प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे. 

संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहेत. 

नगरपरिषद, नगरपंचायतींची प्रारुप मतदार यादीची 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार 

राज्यातील 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. प्राभगनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाईल.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदारांची नावे पत्ते कायम

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या याबाबत हरकती व सूचना मतदार दाखल करू शकतात.

महत्वाच्या बातम्या:

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक होण्याचा मार्ग जवळपास मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *