Headlines

Uddhav Thackeray On Raj Thackeray: संजय राऊतांनी सांगितले, शेजारील 'शिवतीर्थ'ही आपलंच; उद्धव ठाकरे म्हणाले…

Uddhav Thackeray On Raj Thackeray: संजय राऊतांनी सांगितले, शेजारील 'शिवतीर्थ'ही आपलंच; उद्धव ठाकरे म्हणाले…
Uddhav Thackeray On Raj Thackeray: संजय राऊतांनी सांगितले, शेजारील 'शिवतीर्थ'ही आपलंच; उद्धव ठाकरे म्हणाले…



Uddhav Thackeray On Raj Thackeray मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान म्हणजेच शिवतीर्थ येथे पार पडला. जोरदार पाऊस सुरु असताना देखील उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray Dasara Melava) दसरा मेळाव्याला शिवसैनिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. उद्धव ठाकरेंनी यंदाच्या दसरा मेळाव्यातील भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबतच्या युतीवर देखील उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवतीर्थवर भाषण करताना शेजारील शिवतीर्थ (राज ठाकरेंचं निवासस्थान) देखील आपलंच आहे, असा उच्चार केला होता. त्यानंतरच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीवर विधान केलं. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणत राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचे पुनरुच्चार केला. तर मराठीसाठी कायम एकत्र राहणार, असा निर्धारही उद्धव ठाकरेंनी बोलावून दाखवला. 

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? (Uddhav Thackeray Speech Dasara Melava)

दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावरून दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सेना-मनसे युतीबाबत पुनरूच्चार केलाय. तर मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एक असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. उद्धव ठाकरेंनी युतीबाबत भाष्य केलं असताना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचं दिसून आलं. 

राज-उद्धव मनोमिलनावरून एकनाथ शिंदेंचा टोला (Eknath Shinde On Raj-Uddhav Thackeray)

दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मनोमिलनावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील भाष्य केलंय. कोण कुणाशी मनोमिलन करतं याची चिंता करण्याची गरज नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तर सर्वांचा हिशोब आमच्याकडे आहे असंही शिंदेंनी अधोरेखित केलंय. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकणार असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे.

भाजपने झेंड्यातील हिरवा रंग आधी काढावा- (Uddhav Thackeray On BJP)

एका बाजूला हे मुस्लिमांना शिव्या देणार, त्यांना देशद्रोही म्हणणार, आणि त्याचवेळी आरएसएसचे मोहन भागवत हे दिल्लीमध्ये मुस्लिम मौलवींची भेट घेणार ही अशी यांची नीती आहे.हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, नाहीतर तुमच्या सगळ्या टोप्या घातलेले फोटो आम्ही समोर आणू. भाजपने त्यांच्या झेंड्यातील हिरवा रंग आधी काढावा आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवावे.

संबंधित बातमी:

Balasaheb Thackery Death: ‘बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू होऊन दोन दिवस झालेत’, रामदास कदमांना ‘ती’ गोपनीय माहिती कोणी दिली?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *