
Electric Bond In Maharashtra: आता कागदी बॉण्डची झंझट संपणार आहे. कारण आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉण्डची (Electric Bond) सुरुवात करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक बॉण्डमुळे आयातदार व निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणीमुळे फसवणुकीसही आता आळा बसणार आहे. आधीच्या बॉण्डमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बदल किंवा रक्कम वाढ करणे शक्य होईल. कस्टम अधिकारी व ग्राहकांच्या ई-स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित व पारदर्शक होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांनी इलेक्ट्रॉनिक बॉण्डबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ई-बॉण्ड प्रणालीचा फायदा काय?
- ई-बॉण्ड प्रणाली National E-Governance Services Limited (NeSL) आणि National Informatics Centre (NIC) यांच्या तांत्रिक सहकार्याने आयातदार व र्यातदारांसाठीची सीमाशुल्क प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि सुलभ होणार
- या उपक्रमाअंतर्गत ई-स्टॅम्पिंग, ई-स्वाक्षरी, ऑनलाइन पेमेंट, रिअल टाइम पडताळणी, डिजिटल रेकॉर्ड्स यांचा वापर होणार
- सर्व प्रक्रिया वेगवान, सुरक्षित व पारदर्शक बनवण्यावर सरकारचा भर
- कायदेशीर मुद्रांक शुल्क थेट ऑनलाइन भरण्याची सोय
- उद्योगक्षेत्रासाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार
- व्यवहारातील खर्च व वेळ वाचणार तसेच कागदपत्रांची गुंतागुंत कमी होणार
- कागदपत्रांची गुंतागुंत कमी होणार
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, Video:
आणखी वाचा