मुंबईतील पश्चिम उपनगरातील दोन मेट्रो मार्गिका, Metro 2A आणि Metro 7 वर संध्याकाळच्या वेळी तांत्रिक बिघाड झाला. Power Failure झाल्याचे कारण सांगितले जात आहे. या बिघाडामुळे अनेक मेट्रोमध्ये AC बंद झाले. अनेक स्थानकांदरम्यान मेट्रो थांबल्या. मेट्रो सुरू नसल्यामुळे अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली. या तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाड दूर झाला आहे, मात्र गाड्या उशिराने धावत आहेत. गाड्या पूर्ववत होण्यासाठी काही अवधी लागेल. दुपारच्या वेळेत Metro 3 मध्ये देखील एक समस्या निर्माण झाली होती, ज्यामुळे ती मेट्रो रिकामी करून आली होती. आज मुंबईतील मेट्रो मार्गिकांवर तांत्रिक बिघाड झाले आहेत.