दिनांक ०७/०४/२०२१ रोजी शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालय येथे नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे साहेब यांच्या दालनात मा.प्राजक्त तनपुरेसाहेब,मा,शशिकांत शिंदे साहेब,नवी मुंबई महापलिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले मैडम,प्रशासकीय अधिकारी महेंद्र संप्रेसाहेब,कामगार आयुक्त,राष्ट्रवादी युवक कार्याधक्ष नितीन चव्हाण,विशाल भिलारे व कामगार प्रतिनिधी संजय सुतार, अजय सुपेकर,बाळकृष्ण कदम,चद्रकांत चिकणे, यांच्या समवेत समान काम समान वेतन संबधी चर्चा करण्यासाठी मीटिंग आयोजित करण्यात आली होती. सदर चर्चे नुसार, नगर विकास विभागाने महापालिका प्रशासनाला लेखी आदेश दिले कि लवकरात लवकर समान काम समान वेतनचा प्रस्थाव नगर विकास विभागाकडे सादर करण्यात यावा.
मा.आयुक्त अभिजित बांगर साहेब यांनी सदर विषयाची दखल घेऊन व सदर मीटिंगचा संधर्भ देऊन दिनांक २६/०७/२०२२ रोजी प्रस्थाव सादर केला.सदर विषयाचा नवी मुंबई महानगर पालिकेतील ७००० कंत्राटी कामगारांना फायदा होणार आहे.
मा. आमदार शशिकांत शिंदे साहेब आणि नितीन चव्हाण साहेब व नवी मुंबई राष्ट्रवादी युनियन चे अध्यक्ष संजय सुतार यांच्या मार्फत या विषयासाठी सतत पाठपुरावा सुरु होता.याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी पाठपुरावा करत राहू असे आश्वासन मा आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी दिले.