Headlines

तोपर्यंत नोकर भरती नको, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाबाबतही मोठी घोषणा

तोपर्यंत नोकर भरती नको, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाबाबतही मोठी घोषणा
तोपर्यंत नोकर भरती नको, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाबाबतही मोठी घोषणा



धाराशिव : राज्यात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्याचं (Farmers) मोठं नुकसान झालं असून राज्य सरकारने 32 हजार कोटींचं पॅकेजही जाहीर केलं आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यावर मदतीची रक्कम देण्यात येईल, असे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं आहे. त्यानुसार, काही मदतीची रक्कम जमा होण्यासही सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठा (Maratha) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांनी आता शेतकऱ्यांसाठीभुतोभविष्यती आंदोलन उभारण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच, शेती नुकसानीच्या पंचनाम्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारला 15 दिवसांचा वेळ जरांगे पाटलांकडून देण्यात आला आहे. मात्र, कुणबी प्रमाणपत्र वितरीत झाल्याशिवाय कोणतीही नोकर भरती घेऊ नका, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

शेतकरी हा महत्वाचा घटक असून आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत. त्यामुळे, अतिवृष्टीने झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सरकारला 15 दिवसांचा अवधी देण्यात येत आहे. मात्र, कुणबी प्रमाणपत्र वितरीत झाल्याशिवाय कोणतीही नोकर भरती घेऊ नका, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील डिकसळ येथे आले जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत पुढील दिशा स्पष्ट केली. दरम्यान, राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत 2 सप्टेंबर रोजी कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातील शासन आदेश जारी केला. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे हा शासन निर्णय झाल्याने मराठवाड्यातील कुणबींना ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर आता जरांगे पाटील शेतकरी प्रश्नावर बैठक घेणार आहेत. दिवाळीनंतर या बैठकांचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. गेल्या 100 वर्षात शेती प्रश्नावर उभारले नाही असे आंदोलन उभं करण्याचा निर्धार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला निर्णय घेतला, फडणवसांचे कौतुक करत दिलेला शब्द पाळा ही विनंतीही जरांगे पाटील यांनी आरक्षण कुणबी प्रमाणपत्र वाटपावरुन केली आहे.

मुंडक्यावर पाय द्यावा लागेल – पाटील

मनोज जरांगे पाटील आता मराठा आरक्षणनंतर शेती प्रश्नावर लढा उभारणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिवाळी झाल्यावर राज्यव्यापी बैठक घेन आंदोलन उभारणार असल्याची घोषणा पाटील यांनी केली. असं आंदोलन उभा करावं लागेल की इथून पुढे अन् इथ मागे 100 वर्षात अस आंदोलन कोणी केल नसेल, तेव्हाच शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करु घ्याव्या लागतील. मुंडक्यावरच पाय द्यावा लागेल, नुसत वावरात फिरल्याने, भाषण केल्याने, चिखलात फिरल्याने शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झालेला संसार भर निघणार नाही. शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव द्यायचा असेल, कर्जमुक्ती करायची असेल, नुकसानीची शंकर टक्के भरपाई द्यायची असेल तर ताकतीने आंदोलन लावून धरावं लागणार आहे, त्यासाठी मी प्रयत्न करतोय, असेही पाटील यांनी म्हटले.

हेही वाचा

सोनं सोडा, चांदीच्याही दरात विक्रमी वाढ; गेल्या 24 तासांत सिल्व्हर दागिने 10 हजारांनी महाग

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *