
Mumbai Ahmedabad Highway Traffic Jam : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीमुळे शाळकरी मुलं, रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा फटका सर्वसामान्य वाहन चालका बरोबरच, रुग्णवाहिका यांना ही बसत आहे. अशातच आता दहिसरच्या शारदाश्रम शाळेतील 500 हून अधिक विद्यार्थी पिकनिकवरून परतताना या कोंडीत अडकले होते. शारदाश्रम शाळेतील मुलांची 12 बसेस काल(14 ऑक्टॉबर) सकाळी वजेश्र्वरी येथील एका रिसॉर्टवर पिकनिकसाठी निघाली होती.
पिकनिक आटपून या शाळेतील मुलं पुन्हा दहिसर येथे निघाले असताना त्यांच्या बारा ही बसेस वाहतूक कोंडीत अडकल्या. तर ‘आम्हाला इकडे जगावं की नाही, आम्हाला संताप येतोय,’ असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
Raj Thackeray : राज ठाकरेंचा एक फोन, अन्…..
दरम्यान, याच मुद्याविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कळवण्यात आले असता त्यांच्या फोननंतर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांची सुटका केली. जिल्हाधिकारी यांनी नियोजनाच्या त्रुटी मान्य केल्या असून, अवजड वाहनांच्या अनियंत्रित हालचालीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. या कोंडीत रुग्णवाहिकाही अडकल्या होत्या, त्यामुळे आपत्कालीन सेवांवरही परिणाम झाला आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Mumbai Ahmedabad Highway Traffic Jam : नेमकं प्रकरण काय?
तीन दिवसापासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जॅम आहे. ठाणे ते घोडबंदर रस्त्यावरील गायमुख येथे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या काळावधीत अवजड वाहनांना बंदी असली तरी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं शिरल्याने वाहतूक कोंडीत आणखीन भर पडत आहे. आज मुंबईच्या दादर येथील शारदाश्रम शाळेतील जवळपास 185 मुलं विरारच्या वज्रेश्वरी येथील ग्रेट एस्केप या रिसॉर्टमध्ये शाळेय पिकनिकसाठी आली होती. या शाळेच्या चार बस होत्या. तर मालाड मालवणी येथील मदर टेरेसा ज्युनिअर कॉलेजच्या आठ बसेस ही वसईच्या नवनीत येथील कंपनीत इंडस्ट्रीअल विझीटसाठी आल्या होत्या त्यात ही तिनशेहून अधिक विद्यार्थी होते. महामार्गावरील वाहतूक कोंडीत या १२ ही बसेस अडकल्या होत्या. पिकनिक आणि इंडस्ट्रीअल विझीट संपून पाचच्या दरम्यान या बसेस निघाल्या शिक्षकांचा अंदाज बसेस १० ते ११ वाजेपर्यंत पोहचतील असा होता. माञ तीन किमी च अंतर पार करण्यासाठी यांना तब्बल आठ तास लागले. आणि मग शारदाश्रम शाळेतील प्रशासनाने तात्काळ मदतीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. त्यांनी तातडीने मनसेचे नेते अविनाश जाधव यांना मदत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी वसईचे माजी नगरसेवक आणि मनसे पदाधिकारी यांना तात्काळ मुलांना सुरक्षितस्थळी रेस्क्यू करुन, अन्न पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.
ही बातमीही वाचा:
आणखी वाचा