
मुंबई : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिका निवडणुकांची (Election) रणधुमाळी पाहायला मिळत असून राजकीय पक्ष युती व आघाड्यांमध्ये वाटाघाटी करत आहेत. तर, गावागावात भावी सदस्य आणि नगरसेवक सोशल मीडियावर झळक आहेत. निवडणूक आयोगही कामाला लागला असून जिल्हा प्रशासन गतीमान झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, या निवडणुकांच्या अनुषंगाने आपली उमेदवारी, आणि सत्तेतील सहभागासाठी पक्षप्रवेश व पक्षांतराच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला (NCP) आज दोन मोठे हादरे बसले आहेत. कारण, हिंगोली (Hingoli) आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शप पक्षाच्या जिल्हाध्यांनीच राजीनामा दिला आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनीही आपला राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीतील या दोन्ही नेत्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून हे दोन्ही नेते आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत टायमिंग साधणार असल्याचे समजते.
शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्याचबरोबर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला. गेल्या नऊ वर्षापासून दिलीप चव्हाण हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. परंतु, आता अचानक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला असून लवकरच ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
अहिल्यागरमध्ये नव्या चेहऱ्याला संधी द्या – फाळके (Ahilyanagar NCP)
अहिल्यानगर येथील शरद पवारांच्या राष्ट्रावादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या सात वर्षांपासून ते अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत, कौटुंबिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचा उल्लेख पत्रात आहे. तसेच, फाळके यांच्याकडून नवीन चेहऱ्याला संधी देण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे, त्यांनी केवळ जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून ते सध्यातरी शरद पवारांच्याच राष्ट्रवादीत आहेत. राजेंद्र फाळके हे शरद पवारांचे कट्टर समर्थक असून त्यांचे मूळ गाव आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कर्जत हे आहे.
हेही वाचा
मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा, विधीसंघर्षित बालकासह 6 जणांना अटक, एकास नाशिकमधून उचललं
आणखी वाचा