
मुंबई: मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती (Man helps deliver baby) वेदना सुरू झाल्या. राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा नसताना विकास बेद्रे या तरुणाने तात्काळ डॉक्टर मैत्रिण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासने यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली.(Man helps deliver baby) हा तरूण हा राष्ट्रवादी काँग्रस शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांच्या कर्जत मतदारसंघातील असल्याची माहिती समोर आली आहे, रोहित पवारांनी याबाबची माहिती त्यांच्या सोशल मिडीयावरती शेअर करत तरूणाचं कौतुक केलं आहे.
Rohit Pawar Post: रोहित पवारांची सोशल मिडीया पोस्ट
माझ्या मतदारसंघातील सुपे (ता.कर्जत) येथील विकास बेंद्रे या तरुणाने कोणताही अनुभव नसताना एका अडलेल्या गर्भवती महिलेची सुखरुप प्रसूती करून तिची वेदनेतून सुटका केली. मुंबईत लोकलने प्रवास करत असताना राम मंदिर रेल्वे स्टेशन वर एक महिला प्रसूती वेदनेनं विव्हळत असल्याचं त्याला दिसलं. जवळ कुणी डॉक्टर नव्हता आणि संबंधित महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ॲम्बुलन्सही उपलब्ध होत नव्हती. परंतु प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या या महिलेची अवस्था न पहावल्याने विकासने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन तिच्या सूचनेप्रमाणे यशस्वीपणे प्रसूती केली आणि वेदनांमधून त्या आईची सुटका केली. इथं जात-धर्म न पाहता माणुसकी हाच खरा धर्म आहे, हे त्याने दाखवून दिलं. त्याच्या या धाडसाचं आणि त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं मनापासून कौतुक वाटतं. या कामाबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन!
माझ्या मतदारसंघातील सुपे (ता.कर्जत) येथील विकास बेंद्रे या तरुणाने कोणताही अनुभव नसताना एका अडलेल्या गर्भवती महिलेची सुखरुप प्रसूती करून तिची वेदनेतून सुटका केली. मुंबईत लोकलने प्रवास करत असताना राम मंदिर रेल्वे स्टेशन वर एक महिला प्रसूती वेदनेनं विव्हळत असल्याचं त्याला दिसलं.… pic.twitter.com/o2OMHEHLA0
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 16, 2025
youth helps deliver baby on Mumbai train platform : नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, काल (बुधवारी) रात्री १२.४० च्या सुमारास एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती. प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती मदतीसाठी ओरडू लागली. तिच्या मदतीसाठी कोणी धावून आले नाही. यावेळी त्यातच डब्ब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणाने तात्काळ ट्रेनची इम्रर्जन्सी चैन ओढली. यामुळे राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबली. तरूणाने डॉ. देविका देशमुख यांनीही मध्यरात्रीची वेळ असतानाही माणुसकीच्या नात्याने लगेचच तो उचलून प्रतिसाद दिला. यानंतर देविका यांनी विकास बेद्रे यांना व्हिडीओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप समजावून सांगितली. विकास बेद्रे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही, डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचे तंतोतंत पालन केले.(Man helps deliver baby)
Man helps deliver baby: मध्यरात्री राम मंदिर स्थानकात बाळाच्या रडण्याचा आवाज अन् अभिनंदन
डॉ. देविका देशमुख यांनी मध्यरात्रीचा वेळ असूनही विकास बेद्रे यांचा व्हिडिओ कॉल तात्काळ उचलला आणि परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर त्यांनी विकासला शांतपणे प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजावून सांगितली. विकास बेद्रे यांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक सूचना काळजीपूर्वक पाळली. वैद्यकीय शिक्षणाचा कोणताही अनुभव नसतानाही त्यांनी अपवादात्मक धैर्य आणि संयम दाखवला. या तणावपूर्ण आणि जीवघेण्या प्रसंगी विकास यांनी दाखवलेले अफाट धैर्य आणि समयसूचकता हे खरोखर कौतुकास्पद ठरले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि राम मंदिर रेल्वे स्थानकावर रात्री सव्वा एक ते दोनच्या दरम्यान बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला. त्या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला, आणि उपस्थित प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
आणखी वाचा