Uddhav Thackeray : आजची दिवाळी वेगळी आहे, विशेष आहे. मला खात्री आहे की, मराठी माणसांची एकजूट आणि त्या एकजूटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. असेच सर्वजण आनंदात राहा, प्रकाश घेत राहा सर्वांना आनंद देत राहा असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे बंधू सातवेळा एकत्र आले आहेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशी देखील चर्चा सुरु आहे.
शिवाजी पार्कवर आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माणसेनेच्या दिपोत्सवाचे उद्धाटन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिपोत्सवानिमित्त आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. शिवाजी पार्कवर आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माणसेनेच्या दिपोत्सवाचे उद्धाटन झाले. यावेळी राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंबीय आणि उद्धव ठाकरे यांचे सर्व कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी समोर उपस्थित असलेल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मराठी माणसांची एकजूट आणि त्या एकजूटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाकडून दरवर्षी दिवाळी निमित्त दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दीपोत्सवाचे आयोजन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाकडून दरवर्षी दिवाळी निमित्त दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दीपोत्सवाचे आयोजन केलं जातं. यावर्षीदेखील राज ठाकरे यांच्याकडून दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण हे वेगळं आहे. कारण या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाची पत्रिका जाहीर झाली तेव्हाच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या पत्रिकेवर उद्धव ठाकरे यांचा शिवसेनाप्रमुख असा उल्लेख बघायला मिळाला. त्यामुळे या दीपोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिवाळीनिमत्त चांगलेच राजकीय फटाके फुटणार अशा चर्चांना उधाण आलं. अखेर आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच गाडीतून शिवतीर्थवर दाखल झाले. यावेळी राज ठाकरे यांनी ड्रायव्हिंग केल्याचं चित्र पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या:
Uddhav Thackeray: अरे ठाकरे ब्रँडची अजून सुरुवात नाही झाली, सुरुवात झाल्यावर बघा तुमचा कसा बँड वाजतो, उद्धव ठाकरेंचा इशारा
आणखी वाचा