
कल्याण: कल्याणमधून एक (Kalyan Crime News) धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे (Shivsena) गटाच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला (Attack on Car) करण्यात आला आहे. कार्यालयासमोर भांडण सोडवून जखमी इसमाला रुग्णालयात नेत असताना अज्ञात इसमांकडून शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला (Attack on Car) करण्यात आला आहे. या हल्ल्यात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर सपाट, ओंकार सपाट हे दोघे जखमी झाले आहेत. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे, कल्याण महात्मा फुले पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. (Attack on Car)
Attack on Car: कार्यालयासमोर भांडण सोडवून जखमीला रुग्णालयात नेत असताना हल्ला
कारवरती मोठे मोठे दगड फेकून मारण्यात आले आहेत, त्यामुळे कारच्या काचेच्या खिडक्या आणि मागील बाजू पुर्णपणे चक्काचूर झाली आहे. कारमधील सीटवरती सर्व काचा पसरल्या आहेत. मोठे दगडही सीटवरती पडल्याचं दिसून येत आहे. कार्यालयासमोर भांडण सोडवून जखमी तरूणाला रुग्णालयात नेत असताना हा हल्ला झालेला आहे.
Attack on Car: चारी बाजूंनी गाडीवरती हल्ला झाला
या हल्ल्याबाबत माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी माहिती देताना सांगितलं की, माझ्या ऑफीससमोर गौरी संकुल आहे, तिथे आमचे जवळचे नाना सपाट म्हणून आहेत त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा काही लोकांसोबत वाद झाला. गेटवरती मारहाण झाली. मी समोरच ऑफीसमधून रस्त्यावर गेलो, मी ते पाहिलं त्यांची भांडणं सोडवलं. नाना सपाट यांचा मुलगा ओंकार सपाट याला डोक्याला लागलं होतं. त्याला हॉस्पीटलला न्या म्हटलं आणि रितसर पोलिसांकडे तक्रार करा असं त्यांना सांगितलं होतं. ती तक्रार करून आम्ही बाहेर पडत होतो. तेव्हा चारी बाजूंनी गाडीवरती हल्ला झाला आणि अनेक मुलं गाडीवर हल्ला करत होते, त्या दोघांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यामध्ये गाडीवर हल्ला झाला माझ्यावरतीही हल्ला झाला असं उमेश बोरगावकर यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा