
Sanjay Raut on Ashish Shelar: 90 टक्के लोक ज्यांचं आयुष्य काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलं, ते आता भारतीय जनता पक्षात आहेत. त्यांनी (भाजप) स्वतःची पोरं जन्माला घालावी, दुसऱ्यांच्या पोरांना किती वेळ खेळवणार? पाळणे तेवढेच आहेत, पण पोरं वाढत चालली आहेत, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंत्री आशिष शेलार यांच्यावर (Sanjay Raut slams Ashish Shelar) प्रहार केला. शेलार यांनी केलेल्या टीकेनंतर संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. शेलार यांनी आम्ही हिंदुत्ववादी असल्याच्या घोषणा यांनी शिवाजी पार्कवर केल्या होत्या, पण यांच्या हिंदुत्वाचा रंग काँग्रेसच्या टिळक भवनापर्यत जाऊपर्यंत विरला असा टोला उद्धव आणि राज ठाकरे यांना लगावला होता. मिस्टर फडणवीस साहेब, तुम्ही भ्रष्टाचाराच्या चिखलात डुबक्या मारताय आणि आम्हाला ज्ञान देत आहात. राजकारण करताना तुम्ही जपून करा, कारण आम्ही तुमच्या आधीपासून महाराष्ट्राच्या रस्त्यावर राजकारणात आहोत, असेही राऊत म्हणाले.
मुंबई, पुणे आणि ठाणे तुम्ही कोणाच्या हातात देणार? (Sanjay Raut on BJP)
संजय राऊत यांनी सांगितले की, जसजशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (महापालिका निवडणुका) जवळ येतात, तसे महायुतीतलेही मतभेद आपल्याला प्रकर्षाने पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत. ज्यांना आमच्या सोबत यायचं आहे, आम्ही त्यांचं स्वागत करणार असून ही युती पक्की असल्याचे ते म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोघे या क्षणी एकत्र आहेत मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी. हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे की, महाराष्ट्राची राजधानी मुंबई, पुणे आणि ठाणे तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात, असे राऊत म्हणाले.
अजून मनसेचा प्रस्ताव दिलेला नाही (Sanjay Raut on MNS)
महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी होती, तर इंडिया ब्लॉक लोकसभेसाठी होता. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अशा प्रकारची कोणतीही चर्चा कोणामध्ये झालेली नाही, असेही राऊत यांनी सांगितले. दरम्यान, संजय राऊत यांनी मनसेचा महाविकास आघाडीत समावेश करण्यासाठी अजून मनसेचा प्रस्ताव दिलेला नाही. त्यांची वर्किंग कमिटी असते, स्वातंत्र्य चळवळीचा तो पक्ष असून अजूनही तसाच असून तसा आमचा आणि मनसे नसल्याचे राऊत म्हणाले.
तर आमचाही नारा 75 पार (Sanjay Raut on Thane)
ठाण्यातील भाजपच्या बॅनरबाजीवर राऊत म्हणाले की, ठाण्यामध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या जवळपास तयारीत आहे. रोज त्यांच्या भूमिका समोर येतात. आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार असल्याचे ते म्हणाले. भाजप 70 पार म्हणत असेल, तर आमचाही नारा 75 पार असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या बॅनरबाजीवर मिंधे गटाने बोललं पाहिजे. कारण त्यांची त्यांच्याशी युती आहे, आम्ही कसं काय बोलणार? असे राऊत म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा