Headlines

Vasai Fort : 'महाराजांच्याच गडावर बंदी का?', Vasai Fort मध्ये शिवभक्त आणि सुरक्षारक्षकात वाद

Vasai Fort : 'महाराजांच्याच गडावर बंदी का?', Vasai Fort मध्ये शिवभक्त आणि सुरक्षारक्षकात वाद
Vasai Fort : 'महाराजांच्याच गडावर बंदी का?', Vasai Fort मध्ये शिवभक्त आणि सुरक्षारक्षकात वाद


वसईच्या (Vasai) किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पोषाख घालून गेलेल्या तरुणाला फोटो काढण्यापासून रोखल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ‘एबीपी माझा’ने रियालिटी चेक केला, ज्यात सुरक्षारक्षक आय.पी. पांडेय (IP Pandey) आणि दुर्गप्रेमींशी संवाद साधण्यात आला. ‘महाराजांच्या गड किल्ल्यांवर अशी मनाई आम्ही खपवून घेणार नाही,’ असे तो तरुण सुरक्षारक्षकाला म्हणाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. [s] दुर्गप्रेमींच्या मते, पुरातत्व खात्याच्या (ASI) नियमांमुळे किल्ल्यांवर दीपोत्सव साजरा करण्यासाठी किंवा भगवा ध्वज लावण्यासाठीही परवानगी घ्यावी लागते, जी खेदाची बाब आहे. [s] दुसरीकडे, सुरक्षारक्षकांनी स्पष्ट केले की मोबाईलने वैयक्तिक फोटो किंवा छोटे व्हिडीओ काढायला बंदी नाही, मात्र व्यावसायिक चित्रीकरण किंवा प्री-वेडिंग शूटसाठी सायन येथील कार्यालयातून परवानगी घेणे आवश्यक असते.

आणखी पाहा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *