कल्याणजवळील मोहने परिसरात फटाक्यांच्या स्टॉलवरील वादातून दोन गटांमध्ये झालेल्या तुफान राड्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत स्थानिक तरुणी संध्या साठे हिने धाडस दाखवत जमावाला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. ‘शेकडो गुंडांनी पोलिसांसमोरच दगडफेक करत घरांची तोडफोड करून महिलांनाही मारहाण केली आहे,’ आणि त्यानंतर ‘पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही,’ असा गंभीर आरोप संध्या साठेने केला आहे. सुरुवातीला फटाके खरेदी-विक्रीवरून झालेला वाद रात्री उशिरा इतका विकोपाला गेला की, सुमारे पाचशे गावगुंडांनी लहुजीनगरमध्ये घुसून दगडफेक केली आणि घरांची तोडफोड केली. यावेळी अनेक महिला आणि तरुणांना मारहाण करण्यात आली, ज्यात ९ ते १० जण जखमी झाले. विशेष म्हणजे, खडकपाडा पोलीस घटनास्थळी हजर असतानाही हा सर्व प्रकार घडला, ज्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आणखी पाहा