
मुंबई : शहरात आगीच्या घटना सतत घडत आहेत. ताज्या घटनेत जोगेश्वरी (Jogeshwari Fire) परिसरातील एका इमारतीत भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. ही आग इमारतीच्या चार मजल्यांपर्यंत पसरली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर (Jogeshwari Fire) अखेर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. संबंधित अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. या आगीमध्ये अनेक जण अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. जोगेश्वरी मध्ये जेएमएस बिजनेस पार्क इमारतीमध्ये लागली आग तब्बल 4 तासानंतर आटोक्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मोठी चुकीमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.(Jogeshwari Fire)
Jogeshwari Fire : पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आगीची घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप
इमारतीमध्ये ओसी नसताना पालिकेकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. इमारतीमध्ये ओसी (OC) नसताना मोठा संख्येमध्ये लोकं भाड्याने गोदाम आणि दुकान घेऊन ते चाललत होते. पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आगीची घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सध्या 16 ते 17 लोकांना या आगीमधून सुखरूप रेस्क्यू करण्यात आले आहे, तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. ओशिवरा पोलीस आग कशामुळे लागली, ओसी (OC) नसताना विकासकाने इमारतीमधील दुकान भाड्याने कशी दिली, त्याचसोबत यामध्ये पालिकेने का दुर्लक्ष केलं या संदर्भात अधिक तपास करत आहे.
Jogeshwari Fire : सुरुवातीला इमारतीचा सातवा मजल्यावर आग लागली
जेएमएस बिझनेस पार्क इमारतीला OC नाही. ओसी नसताना सुद्धा इमारतीमध्ये लोकांना भाड्यावर दुकान दिला गेला. त्यामुळे ओशिवरा पोलीस आता डेव्हलपर वर कारवाई करण्याची तयारी करत आहेत. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर जोगेश्वरी ट्रामा केअर रुग्णालय मध्ये उपचार सुरू आहेत. शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला. सुरुवातीला इमारतीचा सातवा मजल्यावर आग लागली. नंतर आग वाढत सातवा, आठवा, नववा आणि दहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. या आगीत तीन फ्लोर जळून खाक झाले आहेत. 10 व्या मजल्यावरती अडकलेले लोक मदतीसाठी ओरडत होते, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. अडकलेल्या लोकांनी कपड्याला लपटून घेतले होतं, त्यांची सुटका करण्यात आली आहे.
Jogeshwari Fire : कुठलीही जीवितहानी झाली नाही
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम ओशिवरा भागात JMS बिजनेस पार्क इमारतीमध्ये मोठी आग लागली. सकाळी साडेदहाच्या सुमारास इमारतीचा एका गाळ्यामध्ये ही मोठी आग लागली. मात्र नंतर आग चार माळ्यांवर पसरली. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचा पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले गेले. इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट ऑफिस आहेत, त्यामुळे आग आजूबाजूला वाढण्याची शक्यता होती. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
Jogeshwari Fire : 10:51 वाजता या घटनेची माहिती मिळाली
आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट ऑफिस आहेत, त्यामुळे आग आजूबाजूला वाढण्याची शक्यता होती, मात्र चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे. रिपोर्ट्सनुसार, आज सकाळी जोगेश्वरी पश्चिम येथील जेएनएस बिझनेस सेंटरमध्ये 10:51 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. गांधी शाळेजवळील बेहरामपाडा येथील एस.व्ही. रोडवरील ही एक उंच इमारत आहे. आग लागताच परिसरात मध्ये भीतीचं वातावरण पसरलं. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) मुंबई अग्निशमन दलाला (एमएफबी) 10:51 वाजता या घटनेची माहिती मिळाली. मुंबई अग्निशमन दलाने लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लेव्हल-2 घोषित केले.
आणखी वाचा