कल्याणमधील मोहने गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकारी संध्या साठे यांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणी सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पोलिसांनी ऍक्शन घेतलेली आहे, दोन मिनिटांच्या आत ऍक्शन घेतलेली आहे’, असा दावा सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी केला आहे. फटाके खरेदीच्या किरकोळ वादातून या प्रकरणाची सुरुवात झाली, मात्र नंतर स्थानिक गावगुंडांनी मध्यरात्री लहुजीनगरमध्ये जाऊन घरांची तोडफोड केली, महिलांना मारहाण केली आणि दगडफेक केली. या हल्ल्यात सुमारे नऊ ते दहा जण जखमी झाले आहेत. शेकडो गुंडांनी पोलिसांसमोरच हा हिंसाचार केल्याचा गंभीर आरोप पीडितांकडून करण्यात येत आहे. खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे सांगितले असून, दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आणखी पाहा